... यामुळे नवजोत सिंह सिद्धूंनी सोडला कपिल शर्माचा शो

नवजोत सिंह सिध्दूच्या जागी अर्चना पूरन सिंह

Updated: Nov 17, 2019, 05:06 PM IST
... यामुळे नवजोत सिंह सिद्धूंनी सोडला कपिल शर्माचा शो

मुंबई : नवजोत सिंह सिद्धूंच्या (Navjot Singh Sidhu) जागी 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये अभिनेत्री अर्चना पूरन सिंहला घेण्यात आलं आहे. 10 महिन्यांपासून अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) या शोचा एक भाग आहेत. शोमध्ये अनेकदा कपिल अर्चनाची सिद्धूंच्या नावावरून मस्करी करत असतो. शोच्या दरम्यान कपिल शर्माने एक महत्वाची गोष्ट सांगितली. नवजोत सिंह सिद्धूंनी हा शो का सोडला? याचं कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे. 

'पागलपंती' या सिनेमाच्या कलाकारांसमोर कपिल शर्माने ही गोष्ट सांगितली. कपिलच्या शोमध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अरशद वारसी आणि उर्वशी रौतेला आले होते. यावेळी भरपूर मस्ती सुरू असताना अनिल कपूर कपिलला म्हणतात,'उर्वशी आल्यानंतर तू चांगला शो होस्ट करत आहेस.' त्यानंतर कपिल उत्तर देतो की, 'उर्वशीच्या येण्यानंतर तुमचे देखील डोळे उघडले'. अशी मस्करी सुरू असतानाच अर्चना पूरन सिंह देखील यामध्ये सहभागी होतात. 

शोमध्ये पुढे कपिल उर्वशीला म्हणतो की,'तुम्ही येताच सगळ्यांची तपस्या भंग केली. तुम्ही गेल्यावेळे आलात तेव्हा सिद्धू तुमच्या मागे-मागे निघून गेले. ते अजून परत आलेले नाहीत.' कपिलची ही गोष्ट ऐकताच सगळे लोकं हसू लागतात. (अर्चना पूरन सिंहची ही बातमी देखील वाचा) 

दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामा दहशतवादी हल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य गेलं होतं. यानंतर सिद्धूंनी हा शो सोडल्याचं म्हटलं जातंय. तसेच त्यावेळी नवज्योत सिंह सिद्धू यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांनी शो थांबवला.