तिसरं लग्न कधी करतोस? कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने दिली 'अशी' प्रतिक्रिया

सध्या आमिर आणि कपिल शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंटही करताना दिसत आहेत. 

नम्रता पाटील | Updated: Apr 24, 2024, 07:00 PM IST
तिसरं लग्न कधी करतोस? कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने दिली 'अशी' प्रतिक्रिया title=

Aamir Khan Reaction On Third Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने नुकतंच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी कपिल शर्माने आमिर खानला त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरसोबतच कौटुंबिक आयुष्याबद्दलही प्रश्न विचारले. याला आमिर खाननेही त्याच्या अंदाजात उत्तर दिली. हा भाग येत्या 27 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची सातत्याने चर्चा सुरु आहे. आता कपिल शर्माने आमिर खानला अप्रत्यक्षपणे तिसऱ्या लग्नाबद्दल विचारणा केली. या प्रोमोच्या शेवटी कपिल शर्मा हा तुम्हाला नाही वाटत का की आता तू सेटल डाऊन व्हायला हवं, असे आमिर खानला विचारतो. आमिरच्या या प्रश्नाने प्रेक्षकही थक्क होतात. विशेष म्हणजे आमिरही त्याच्याकडे प्रश्नार्थ नजरेने पाहताना दिसतो.

आमिर खान-कपिल शर्माचा व्हिडीओ व्हायरल

यानंतर आमिर खान हा कपिलच्या प्रश्नावर काहीही उत्तर देत नाही. पण तो जोरजोरात हसतो. आमिरची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर चाहतेही जोरजोरात हसू लागतात. सध्या आमिर आणि कपिल शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंटही करताना दिसत आहेत. 

घरी मुलं तुझं ऐकतात का?

विशेष म्हणजे या कार्यक्रमात कपिल शर्मा हा घरी मुलं तुझं ऐकतात का? असा प्रश्न आमिर खानला विचारतो. त्यावर आमिर म्हणतो, मी मनापासून सांगतो की माझी मुलं माझं जराही ऐकत नाही. हे ऐकल्यावर सर्वजण हसू लागतात. त्यानंतर आमिर म्हणतो मी आता जे घातलंय, त्यावरही खास चर्चा झाली आहे. त्यावर अर्चना म्हणते अरे मग चांगलं आहे ना. त्यावर मी या कार्यक्रमात शॉर्ट्स परिधान करुन येणार होतो, पण मुलांनी जिन्स घालून जा असे सांगितले. म्हणून मी जिन्स घातली, असे आमिर खानने सांगितले. 

दरम्यान आमिर खानने दोनदा लग्न केले आहे. आमिर खानचे पहिले लग्न रिना दत्तासोबत झाले आहे. त्या दोघांना जुनैद आणि आयरा खान अशी दोन मुलं आहेत. रिनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षांनी आमिर आणि किरण रावने सरोगसीद्वारे आझादला जन्म दिला. लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव हे 2021 ला विभक्त झाले. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण पालक म्हणून आझादचा एकत्र सांभाळ करत आहेत.