Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. तो आज आनंदी आयुष्य जगत असला तरी त्याच्या आयुष्यात कधीच वाईट काळा आला नव्हता हे सत्य नाही. प्रत्येक व्यक्ती प्रमाणे त्याच्याही आयुष्यात एक वाईट काळा आला होता. तो अशा एका संकटात अडकला होता की त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले. कपिल शर्माला काही वाईट सवयींमुळे अनेक समस्यांचा सामना कसा करावा लागला याचा खुलासा केला होता.
कपिलनं त्याच्या मेहनतीच्या जोरावर खूप काही मिळवलं. पण त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि याच काळात तो आत्महत्येचा विचार करू लागला. त्याकाळात बॉलिवडूचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आयुष्यातला देवदूत बनून आला. तो आला आणि त्यांने या संकटातून कपिल शर्माला बाहेर काढलं, याविषयी स्वत: कपिलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
कपिल शर्माने एका मुलाखतीदरम्यान अल्कोहोल सेवन आणि त्यामुळे वाढणारी चिंता याविषयी सांगितले होते. या दोन्ही अडचणींतून बाहेर पडण्यासाठी शाहरुख खानने त्याला मदत केल्याचे त्यानं सांगितले. कपिलने याविषयी सांगितले होते की, त्याने मद्यपाण करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये सतत खाली पडत होता. मात्र, शाहरुख खानच्या मदतीने तो पुन्हा रुळावर आला.
'फिरंगी' चित्रपटादरम्यान कपिलनं सांगितले होते की, शाहरुख खानने त्याला मानसिक आणि शारीरिक मार्गदर्शन केले होते आणि मद्यसेवन आणि त्याच्या नर्व्हसनेसमधून बाहेर पडण्यास मदत केली होती. त्याने सांगितले की, एकेकाळी तो इतका डिप्रेशनमध्ये गेला होता की, त्याला स्टेजवर परफॉर्म करायलाही भीती वाटत होती आणि तो आपल्या श्वानासोबत ऑफिसमध्ये स्वत:ला कोंडून ठेवायचा. त्याच्या शोमध्ये लोक येणं देखील बंद झालं होतं आणि तो लोकांच्या आठवणींतून बाहेर पडू लागला होता.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा
मात्र, त्याचा मूड थोडा बदलण्यासाठी त्याच्या एका मित्राने त्याला काही दिवस त्याच्या सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहण्याचा सल्ला दिला. अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर समोरचा अथांग समुद्र पाहून त्यात उडी मारावी असे त्याच्या मनात आले होते. आज या गोष्टीला अनेक वर्षे झाले असून कपिल शर्मा त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगतोय.