VIDEO : 'कुणाचा Gay पार्टनर व्हायला आवडेल?', करणला राजकुमारचं उत्तर असं होतं...

हा प्रोमो पाहिल्यानंतर राजकुमारच्या हजरजबाबीपणाला त्याच्या फॅन्सकडून दाद मिळतेय

Updated: Jan 23, 2019, 10:18 AM IST
VIDEO : 'कुणाचा Gay पार्टनर व्हायला आवडेल?', करणला राजकुमारचं उत्तर असं होतं...

मुंबई : सिनेदिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या सहावा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलाच गाजतोय. यावेळी या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर दिसणार आहेत. स्टार वर्ल्ड इंडियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये राजकुमार करणच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ढंगात देताना दिसतोय. 

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात करण जोहर राजकुमार रावला विचारतोय 'तुला संधी मिळाली तर कोणत्या अभिनेत्यासोबत Gay भूमिका करायला आवडेल?' त्यावर राजकुमारही उत्तर देतो, 'बॉम्बे वेलवेटनंतर तुम्ही कोणता सिनेमात काम नाही करत ना?' या उत्तरावर चपापलेल्या करणनं सावरत म्हटलं... 'मी यशस्वी अभिनेत्यांची गोष्ट करतोय'... हा प्रोमो पाहिल्यानंतर राजकुमारच्या हजरजबाबीपणाला त्याच्या फॅन्सकडून दाद मिळतेय.