Karan Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…

Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे. 

Updated: Feb 15, 2023, 04:27 PM IST
Karan Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…   title=

Sidharth Malhotra -Kiara Advani : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra -Kiara Advani ) दोघेही 7 फेब्रुवारीला विवाहबद्ध झाले. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होता. आता लग्नानंतर त्याने या नवविवाहित दांपत्याला मोठं गिफ्ट दिलं आहे. 

5,6 आणि 7 फेब्रुवारी रोजी या दोघांचं लग्न जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये धुमधडाक्यात पार पडलं. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे. करण जोहर याच्याकडून सिद्धार्थ-कियाराला (Sidharth Malhotra -Kiara Advani ) मिळालेली भेट म्हणजे 3 बिग बजेट चित्रपट देणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट 'शेरशाह' होता. या चित्रपटात दोघांच्या जोडीनं चाहत्यांची मनं जिंकली होती. विशेष म्हणजे या चित्रपटांची निर्मिती करण जोहर करणार आहे. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि तिथेच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जातं.  

वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार! 

एका मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराने करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनशी एक करार केला आहे. त्यानुसार ही जोडी धर्मा प्रोडक्शनच्या ३ चित्रपटांत दिसणार आहे. त्यातील एक चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करतील असे बोलण्यात येत आहे. हा चित्रपट ‘बद्री की दुल्हनिया’ या फ्रेंचायझीमधील असेल. पण यांचे हे चित्रपट कधी प्रदर्शित होतील हे अजून जाहीर झालेलं नाही.  

तसेच मीडिया रिपोर्टनुसार एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी शशांक खेतान याचा नवीन चित्रपटासाठी साईन केला आहे. म्हणजेच काय तर आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कियारा ही लग्नमंडपात येताना दिसत असून सिद्धार्थ मल्होत्रा हा कियाराची वाट बघत थांबल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.