Neena Gupta on father: ''माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा'' हे काय बोलून गेली नीना गुप्ता

Neena Gupta On Father : बोल्ड आणि ब्युटीफुल नीना गुप्ताच्या फिल्मी करीयरपेक्षा तिचं पर्सनल आयुष्याच्या खूप चर्चा झाल्या, मात्र त्याकडे लक्ष न देता नीना गुप्ताने नेहमी आयुष्याच्या सकारात्मक बाजूने पाहत पुढे चालण्याचा निर्णय घेतला.

Updated: Feb 15, 2023, 04:22 PM IST
Neena Gupta on father: ''माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा'' हे काय बोलून गेली नीना गुप्ता title=

Neena Gupta On Father : बोल्ड आणि बिनधास्त स्टेटमेंटमुळे नीना गुप्ता (Actress Neena Gupta) नेहमीच चर्चेत असतात. या वयातही तरुणींना लाजवेल इतक्या एनर्जीने ती काम करते. नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते.  विवियन रिचर्डसोबत लिव्ह इन रिलेशनशिप (Live-in Relationship) आणि मग ब्रेकअप अश्या अनेक गोष्टींनी तीच आयुष्य फारच चर्चेत राहिलं.   नुकताच एका मुलाखतीत नीना गुप्ताने एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर होत आहे. 

नीना गुप्ता गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, (neena gupta bold statements) 'बधाई हो’ (badhai ho) सारख्या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाला एक वेगळं वळण देऊन नीना गुप्ताने स्वतःच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं

अलीकडेच,अभिनेत्रीने तिच्या एकाकीपणाबद्दल एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी सांगितल्या.
नीना गुप्ता ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेवर अगदी बिनधास्तपाने आपलं मत मांडत असते. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने पर्सनल आयुष्यासंदर्भात अनेक खुलासे केले आणि पुन्हा एकदा नीना गुप्तांच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा आहे. नीना गुप्ता यांचं आयुष्य हे बऱ्यापैकी

एकाकीपणात गेलं ,यात तीचं मॅरीड लाईफ हेसुद्धा त्यांच्या एकाकीपणाचं कारण आहे असं त्या सांगतात मात्र या एकटेपणामुळे त्या कधीच घाबरल्या नाहीत किंवा त्यापासून लांब गेल्या नाहीत. नीना गुप्तांनी मुलाखतीत सांगितले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यात असे अनेक वेळा घडले,की मी

एकटी पडले आहे, याचे कारण असे की, मला अनेक वर्षांपासून प्रियकर किंवा नवरा नव्हता. खरे सांगायचे तर माझे वडीलच त्यावेळी माझे बॉयफ्रेंड असायचे. त्यांच्यासोबतच मी सगळं काही केलं, सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांना शेअर करायचे . कामाच्या ठिकाणी माझा अपमान अनेकदा

करण्यात आला.त्या काळामध्ये मला माझ्या आयुष्यात अनेकदा एकटेपणा जाणवला आहे, पण देवाने मला एक शक्ती दिली आहे जी मला पुढे जाण्यासाठी नेहमीच मदत करते, ती म्हणजे मी भूतकाळात राहत नाही. एकेकाळी नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर (west indies cricket team) विवियन रिचर्डसोबत (neena gfupta with vivian richard) रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यादरम्यान त्यांच्या नात्याने अनेकदा मीडियाचे लक्ष वेधले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

दोघांनाही एक मुलगी आहे, जिचे नाव मसाबा गुप्ता (masaba gupta) आहे. या मुलीला मुलगी नीना गुप्ता हिने वाढवली आहे (masaba gupta web series). विशेष म्हणजे विवियन आणि नीना यांनी एकमेकांशी लग्न केले नव्हते, त्यांचे अफेअर होते,विवियन रिचर्ड्ससोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी नीनाने 2008 मध्ये विवेक मेहराशी लग्न केले. (neena gupta married to vivek mehra)