करण जोहरच्या ड्रग्स पार्टीवर NCBची नजर

सुशांत अत्महत्या प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येत आहेत.   

Updated: Sep 19, 2020, 08:39 PM IST
करण जोहरच्या ड्रग्स पार्टीवर NCBची नजर

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. सुशांत अत्महत्या प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येत आहेत. सध्या ड्रग्स कनेक्शन चांगलचं गाजत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक खुलासे होत आहेत. रियाने ड्रग्स प्रकरणी २५ जणांची नावं घेतली. त्यामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंगचं देखील नाव आहे. 

 याच दरम्यान गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. आता हा व्हिडिओ एनसीबीच्या देखील हाती लागल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अधिक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी करण जोहरसह बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सविरूद्ध तक्रार केली आहे.

आता या पार्टीच्या व्हिडिओवर एनसीबीची देखील नजर आहे. खुद्द करण जोहरने हा व्हिडिओ सोशल मीडीयावर पोस्ट केला. त्यानंतर या व्हिडिओवर टीका देखील करण्यात आली. या पार्टीमध्ये विक्की कौशल, दीपिका पादुकोण, झोया अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर उपस्थित होते. 

३०  जुलै २०१९ मध्ये झालेल्या या पार्टीची चौकशी एनसीबी करत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा ड्रग्स कनेक्शनशी संबंध आल्यामुळे एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) चा तपास सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतलं आहे.