SSR प्रकरण : एनसीबीने अटक केलेल्या रोहन तलवारला कोरोनाची लागण

शुक्रवारी एनसीबीने केलं होतं अटक 

Updated: Sep 19, 2020, 06:49 PM IST
SSR प्रकरण : एनसीबीने अटक केलेल्या रोहन तलवारला कोरोनाची लागण

मुंबई : सुशांत प्रकरणात एनसीबीने शुक्रवारी अटक केलेला आरोपी रोहन तलवार याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहन तलवार याला शुक्रवारी पवई विभागातून अटक करण्यात आली आहे. रोहनला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन पुढे आलं आहे. याबाबत आता एनसीबी तपास करत आहे. या तपासात शुक्रवारी रोहन तलवारला अटक करण्यात आली. रोहनकडून १० ग्राम गांजा सापडला होता. रोहनला आज कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय टेस्ट करण्यात आली असता तो पॉसिटीव्ह असल्याचं कळलं आहे. कोर्टाला याबाबत माहिती देण्यात आली असता कोर्टाने रोहन याला जेजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे आदेश दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा ड्रग्स कनेक्शनशी संबंध आल्यामुळे एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) चा तपास सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे सिटी क्राइम ब्रांच पोलिसांनी (CCB) ने शनिवारी या ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टी अटक केली आहे. त्याच्या जवळ ड्रग्स ठेवण्याचा आरोप असून या प्रकरणाचा आता तपास केला जात आहे.