करिना कपूरचा क्रिकेटचा हा खेळ पाहून कपिलही म्हणाला असेल 'देवा'

करिना कपूरसह कपिल देव क्रिकेट खेळताना...

Updated: Aug 8, 2019, 07:08 PM IST
करिना कपूरचा क्रिकेटचा हा खेळ पाहून कपिलही म्हणाला असेल 'देवा'

मुंबई : बॉलिवूड 'बेबो' करिना कपूर सध्या रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स ७' मध्ये परिक्षक म्हणून दिसते आहे. नुकतंच 'डान्स इंडिया डान्स ७'च्या सेटवर भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव पाहुणे म्हणून पोहचले होते. कपिल देव 'डान्स इंडिया डान्स ७'च्या सेटवर संपूर्ण टीमसोबत मज्जा-मस्ती करताना पाहायला मिळाले.

या शोमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये करिना कपूरसह कपिल देव क्रिकेट खेळताना दिसत आहेत. करिना आणि कपिल देव यांचा हा व्हिडिओ 'झी५'ने ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये कपिल देव आणि करिना एकमेकांसाठी बॉलिंग करताना दिसतायेत. करिना आणि कपिल देव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कपिल देव, करिनाला तिच्या मुलाचं नाव एका बॅटवर सही करुन देतात. याबाबत करिनाने आनंद व्यक्त करत, माझ्या मुलाने क्रिकेटर बनावं अशी इच्छाही व्यक्त केली. कपिल देव यांनी मला हे सर्वात मोठं गिफ्ट दिलं असल्याची भावनाही करिनाने व्यक्त केली.