close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करिना कपूरने 'Kiss of love'सोबत साजरा केला वाढदिवस

पाहा वाढदिवसाचे खास फोटो 

Updated: Sep 21, 2019, 11:27 AM IST
करिना कपूरने 'Kiss of love'सोबत साजरा केला वाढदिवस

मुंबई : 21 सप्टेंबर रोजी बॉलिवूडची 'पू' म्हणजे करिना कपूर खान हिचा आज 39 वा वाढदिवस आहे. करिना आपल्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी पतौडी महालात करत आहे. यंदा करिनाने आपला वाढदिवस खासगी सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला. पण असं असलं तरीही या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहे. 

करिनासोबत तिची बहिण करिश्मा कपूर देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी आहे. तिने या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत करिना चॉकलेट केक खाताना दिसत आहे. 
करिनाचं बर्थ डे सेलिब्रेशन अगदी मस्त सुरू असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday my darling bebo ! We love you Direction by @gauravvkchawla  @diljitdosanjh #happybirthdaybebo #pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

या सेलिब्रेशनचे फोटो खूप बोलके आहेत. यावेळी करिनाने Kiss of Love म्हणतं अभिनेता आणि नवरा सैफ अली खानला किस केलं आहे.

kareena kapoor

करिना कपूरच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडिया पेजवर करिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

करिना सध्या भरपूर बिझी आहे. टीव्हीपासून ते अगदी सिनेमांमध्ये तिचं शूट सुरू आहे. सध्या करिना Zee TV च्या रिअॅलिटी डान्स शोमध्ये 'डान्स इंडिया डान्स'मध्ये दिसणार आहे. यासोबतच अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीसोबत 'गुड न्यूज'मध्ये दिसणार आहे. तर लवकरच तिचा करण जोहरच्या 'तख्त' सिनेमा दिसणार आहे. एवढंच नाही तर इरफान खानच्या 'इंग्रजी मीडियम'मध्ये देखील बेबो दिसणार आहे.