close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Teaser : 'ट्रिपल सीट' घेऊन अंकुश चौधरी सज्ज

पाहा हा खास टिझर 

Updated: Sep 21, 2019, 10:41 AM IST
Teaser : 'ट्रिपल सीट' घेऊन अंकुश चौधरी सज्ज

मुंबई : महाराष्ट्राचा सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी 'ट्रिपल सीट' घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मुक्ता बर्वेसोबत लोकप्रिय ठरलेल्या 'डबल सीट'नंतर आता अंकुश चौधरी शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटीलसोबत या सिनेमात दिसणार आहे. 

'वायरलेस प्रेमाची कहाणी' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला तेव्हा अंकुश चौधरीमध्ये बासरी घेऊन मध्यभागी उभा असतो तर त्याच्या दोन्ही बाजूला अभिनेत्री पल्लवी आणि शिवानी होती. त्यामुळे आता या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. 

अंकुश या सिनेमात कृष्णा सुर्वे या तरूणाची भूमिका साकारतो. कृष्णा या सिनेमात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काहीही करायला तयार असतो. आणि त्याच्या या काहीही करण्याची धम्माल या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

'मुळशी पॅटर्न' या सिनेमानंतर ज्या व्यक्तीची खतरनाक चर्चा झाली ते म्हणजे प्रवीण तरडे देखील या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहेत. संकेत पावसेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून नरेंद्र फिरोदिया यांची निर्मिती आहे. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

या अगोदर अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेसोबत 'डबल सीट' या सिनेमातून भेटीला आहे. या सिनेमातून त्याने मुंबईतील सामान्य तरूणाचा प्रश्न पडद्यावर मांडला आहे. पण या सिनेमाचा आणि ट्रिपल सीट सिनेमाचा कोणताही संबंध नाही. अंकुशच्या या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.