'नशेत आहे का?' सैफसोबत डिनर डेटवर गेलेल्या करीनाला लोकांनी केलं ट्रोल

Kareena Kapoor Khan Troll : करीना कपूर ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ट्रोल झाली आहे. सैफ अली खानसोबतचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 2, 2023, 05:58 PM IST
'नशेत आहे का?' सैफसोबत डिनर डेटवर गेलेल्या करीनाला लोकांनी केलं ट्रोल title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Kareena Kapoor Khan Troll : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. करीना कामात कितीही व्यग्र असली तरी देखील ती कुटुंबासाठी नक्कीच वेळ काढताना दिसते. अनेकदा करीना आणि सैफ आपल्याला फॅमिली टाईम घालवताना दिसतात. तेव्हा त्यांच्या मुलांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान, आता करीना आणि सैफ एकत्र डेटवर गेल्याचे पाहायला मिळते. पण यावेळी ते त्यांच्या मित्र-मंडळींसोबत आउटिंगला गेले होते. त्यात काल रविवार तर हा दिवस कुटुंब आणि मित्र-मंडळींसाठीच असतो. त्यातलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करीनाची अवस्थापाहून सगळ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

करीनाचा व्हिडीओ व्हायरल

करीना कपूरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत करीना आणि सैफ एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओत सैफनं लाल रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तर करीनानं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातील सैफ पत्नी करीनाला हाथ धरून बाहेर येताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्यानं करीनाला गाडीतही बसवून दिले. त्यावेळी करीनाचा लूक पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीना कपूर ट्रोल

खरंतर अनेकांना सैफचं हे लव्हिंग स्वभाव प्रचंड आवडला आहे आणि नेटकऱ्यांनी त्याच्या केमिस्ट्रीवर प्रतिक्रिया ही दिल्या आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे. करीनाला या अवस्थेत पाहून अनेक नेटकऱ्यांनी म्हटले की तिनं मद्यपान केलं आहे. त्यामुळे सैफनं तिचा हात पकडला आहे. सैफनं पापाराझींना हॅलो देखील म्हटले, पण करीना पापाराझींना काहीच बोलली नाही. करीला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'मद्यपान केलं आहे, मग हात तर धरेलच ना.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'करीनानं मद्यपान केलं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'करीना पूर्ण टल्ली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'इतकी पिल्यानंतरही ही स्टायलीश दिसते.' 

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून

करीनाचं काम

करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'जाने जा' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप 10 ट्रेंड करणाऱ्या चित्रपटांमध्ये एक होता. याशिवाय, करीना लवकरच क्रिती सेनन आणि तब्बूसोबत 'द क्रू' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.