करीनाने शेअर केलं बेडरूममधील सीक्रेट, झोपण्यापूर्वी 'या' तीन गोष्टी बेडवर हव्याच

करीनाच्या या उत्तराने सारेच चक्रावले 

Updated: Apr 14, 2021, 09:44 PM IST
करीनाने शेअर केलं बेडरूममधील सीक्रेट, झोपण्यापूर्वी 'या' तीन गोष्टी बेडवर हव्याच

मुंबई : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)  बॉलिवूडमधील डीवा आहे... जी आपल्या अभिनयासोबतच स्टाइलने चाहत्यांचं मन जिंकून घेते. करीना आपल्या मनात काहीच लपून ठेवत नाही जे वाटतं ते अगदी स्पष्टपणे बोलते. फक्त एवढंच नाही तर नवरा सैफ अली खानशी संबंधित अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. (Kareena Kapoor Khan reveals her quirky bedroom secret ) हल्लीच एका शूट दरम्यान करीनाने आपल्या बेडरूममधील सीक्रेटचा खुलासा केला आहे. 

करीना कपूर खानने 2012 साली सैफसोबत लग्न केलं. लग्नाच्या अगोदर या दोघांच्या प्रेमसंबंधामुळे ते चर्चेत गोते. लग्नानंतर या दोघांमधील रोमान्स आणखी वाढला. लोकांना यांच्यातील रोमँटिक किस्से जाणून घेण्यात अधिक उत्सुकता आहे. आता तर चक्क करीनाने आपल्या बेडरूममधील एक किस्सा शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीना झोपण्यापूर्वी या तीन गोष्टी बेडवर घेते 

करीनाने हा किस्सा स्वतः शेअर केला आहे. करीना झोपण्यापूर्वी आपल्या बेडवर तीन गोष्टी घेऊन जाते. करीनाने सांगितलं की,'बेडवर झोपण्यापूर्वी मी तीन गोष्टीसोबत घेते. पहिली गोष्ट वाइनची बॉटल, पजामा आणि नवरा सैफ. ही गोष्ट ऐकून तिथे उपस्थित असलेले लोकं हसू लागले.' 

करीनाला या सगळ्या गोष्टी सांगण्यास काहीच हरकत नाही. पुढे करीना म्हणाली, मला नाही वाटत यापेक्षा सर्वात जास्त मजेशीर काय उत्तर असू शकेल. मला याकरता बक्षिस मिळायला हवं.