Viral Video: डर सबको लगता है.... पाहा कोणाच्या भीतीनं उडाला करिनाचा थरकाप

झिरो फिगरपासून फिट अँड फॅट मॉम असा तिचा प्रवास सर्वांनीच पाहिला

Updated: Mar 26, 2022, 09:55 AM IST
Viral Video: डर सबको लगता है.... पाहा कोणाच्या भीतीनं उडाला करिनाचा थरकाप title=

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान, हिनं कायमच तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. करिनानं आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेसाठी ती कायमच स्वत:मध्येही काही बदल करताना दिसली. झिरो फिगरपासून फिट अँड फॅट मॉम असा तिचा प्रवास सर्वांनीच पाहिला. करिनाच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक गुणविशेष म्हणजे परखडपणा. (Kareena Kapoor Khan)

आपली मतं स्पष्टपणे मांडणारी हीच करिना कुणा एका व्यक्तीला घाबरते, असं आम्ही म्हणालो तर...?

गेल्या काही दिवसांपासून करिना सोशल मीडियावर तिच्या दडलेलं खवैय्याचं रुप सर्वांसमोर आणत आहे. कुठे ती बिर्याणीवर ताव मारताना दिसतेय तर कुठे मुगडाळीचा हलवा खाताना दिसतेय.

इथे आपण अभिनेत्रींसारखा बांधा हवा म्हणून डाएटची सुरुवात करत असतानाच करिना मात्र खाण्यावर मस्त ताव मारताना दिसत आहे. तिची ही करामत सोशल मीडियावर आली, आणि तिच्याच योगा प्रशिक्षकांनीही पाहिली.

याच भीतीनं तिने पुन्हा एकदा आपला मोर्चा योगाभ्यास आणि संतुलित आहाराच्या सवयींकडे वळवला आहे. योगा करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत करिनानं शेअर केला आहे.

तिनं लिहिलेलं कॅप्शन पाहता यातून योगा प्रशिक्षकांच्या भीतीमुळं तिनं चक्क बिर्याणी आणि हलव्यालाही रामराम ठोकल्याचं कळत आहे.

करिनानं तिची चुकलेली वाट पुन्हा योग्य मार्गावर आणून जोडली. तिनं पुन्हा चांगल्याची सुरुवात केली. धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी दूर लोटाव्या लागतात.

पण, चांगल्या जगण्यासाठी इतका त्याग गरजेचाच असतो. नाही का ?