स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका - करीना कपूर

घराणेशाहीवरील वक्तव्यानंतर करीना सोशल मीडियावर ट्रोल  

Updated: Aug 11, 2020, 04:02 PM IST
स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका - करीना कपूर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका होत आहे. शिवाय या ट्रोलींगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले आहेत. अनेक कलाकारांनी यावर आपले मत देखील मांडले आहे. मात्र आता अभिनेत्री करीना कपूर खानने याविषयी वक्तव्य केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘मग तुम्ही स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका’ असे बोलताना दिसत आहे. आपल्या वक्तव्यमुळे करीना नेटकऱ्यांच्या जाळ्यात अडकली आहे. मोजो न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला घराणेशाही आणि स्टारकिड्स यांच्याशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. 

यावर ती म्हणाली, 'कोणाला स्टार बनवायचं हे फक्त प्रेक्षकांच्या हाती असतं. जर तुम्हाला स्टार किड्सपासून समस्या असतील तर त्यांचे चित्रपट पाहायला जावू नका.' असं वक्तव्य यावेळी करीनाने केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

परिणामी नेटकऱ्यांनी करीनाचा आगामी ‘लालसिंग चड्ढा’चित्रपट बॉयकोट करण्याची मागणी केली आहे. आमिर खान आणि करीना कपूर चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'लालसिंग चड्ढा' चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे.