मुंबई : तैमुर अली खान लवकरच एका वर्षांचा होणार आहे.
सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवरही तैमुरचं फॅन पेज आहे.
तैमुरचा निरागस चेहरा टिपण्यासाठी एअरपोर्टपासून अनेक सेलेब पार्ट्यांमध्ये फोटोग्राफरची धावाधाव सुरू असते. पण तैमुरचा पहिला वाढदिवस कसा साजरा होणार याबाबतही अनेक तर्क वितर्क समोर आले आहेत.
बॉलिवूड लाईफ़ने दिलेल्या माहितीनुसार तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन नसेल. करिष्मा कपूरने बॉलिवूडलाईफ़ला दिलेल्या माहितीनुसार, तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन होणार नाही. त्याच्या लक्षातही हा वाढदिवस राहणार नाही. पण हे औचित्य साधून आम्ही सुंदर फॅमिली गेट टुगेदर प्लॅन करत असल्याचे करिष्माने सांगितले आहे. जवळचे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही हा दिवस खास करणार आहोत.
तैमुर अली खानचा वाढदिवस २० डिसेंबर रोजी आहे. सैफ आणि करिना कपूरचा तैमुर हा एकुलता एक मुलगा आहे. सैफच्या पहिल्या पत्नीची मुलं सारा, इब्राहिम सोबतच तैमुर अली खान राहतो. लवकरच तैमुर इंग्लंडला हॉस्टेलमध्ये जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.