कार्तिक आर्यनचे फोटो बघून चाहते घायाळ

अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत...

Updated: Aug 8, 2019, 08:43 PM IST
 कार्तिक आर्यनचे फोटो बघून चाहते घायाळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कार्तिकने त्याचे काही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. कार्तिकचे हे फोटो तरुणींना घायाळ करणारे आहेत. या फोटोत कार्तिकने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

कार्तिक आर्यनने याने स्वत:च्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर अभियात क्षेत्रात स्वत:चे वर्चस्व कायम ठेवले आहे. बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना त्याने स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने यश प्राप्त केले. कार्तिकने त्याच्या अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Vegetarian Ladka

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिक हा त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात तो, दहा-बारा तरुणांसोबत एका खोलीत भाड्याने राहत होता. नुकतच कार्तिकने स्वत:चं घर विकत घेतलं आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘लुका छुपी’ यांसारख्या हिट चित्रपटांनंतर कार्तिकची फॅन फॉलोईंगसुद्धा वाढली झाली आहे. 

कार्तिकने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात कार्तिक एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. तरुणींनी या फोटोंना भरभरून लाइक्स करत आहे आणि कमेंट्स देत आहे.

‘व्हेजिटेरियन लडका’ असं कॅप्शन कार्तिकने या फोटोला दिलं आहे. सोशल मीडियावर कार्तिकचे हे, फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांना कार्तिकचा हा शर्टलेस लूक तरुणींना फार आवडला असून अनेकींनी तर कमेंट्समध्ये त्याला लग्नाची मागणी घातली आहे.

मागील काही दिवसात कार्तिक आणि अभिनेत्रा सारा अली खान यांच्या मैत्री चर्चा ही, सोशल मीडिया आणि बॉलिवूडमध्ये रंगतांना दिसत आहे. हे दोघं ‘लव्ह आज कल’च्या सिक्वलमध्ये एकत्र झळकणार आहेत. 

कार्तिकच्या या फोटोला साराने देखील लाइक केलं आहे. सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सारा आणि कार्तिकला ‘लव्ह आज कल’च्या सिक्वलमध्ये साईन केल्या गेलं.

सारा आणि कार्तिक हे दोघे एकामेंकांना डेट करत आहे. असा प्रश्न प्रत्येक चाहत्यांना पडतांना दिसत आहे. सारा आणि कार्तिकची रणवीर सिंगने एका कार्यक्रमात ओळख करून दिली होती.