खिलाडी कुमार ऐवजी 'भूल भुलय्या' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार कार्तिक?

कार्तिक 'भूल भुलय्या २' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Updated: Jun 10, 2019, 12:01 PM IST
खिलाडी कुमार ऐवजी 'भूल भुलय्या' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार कार्तिक?

मुंबई : असंख्य मुलींच्या मनातील ताईद असलेला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चांगल्याच चर्चेत आहे. ईदच्या दिवशी त्याचा आणि अभिनेत्री सारा अली खानचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. आता त्याच्या बद्दल आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कार्तिक 'भूल भुलय्या २' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या तो अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Eid Mubarak 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

 

सुत्रांच्या माहितीनुसार, २००७ रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता अक्षय कुमारच्या 'भूल भुलय्या' चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. विनोदी भयावह कथेवर आधारलेल्या 'भूल भुलय्या' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. 'भूल भुलय्या २' चित्रपटात अक्षयच्या ऐवजी कार्तिक भूमिका साकारणार असण्याच्या चर्चा जोर धरत आहेत.

त्याचप्रमाणे अभिनेता आयुषमान खुराना, राज कुमार रॉय आणि विकी कौशल या कलाकारांची सुद्धा अक्षयच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्क्रिन टेस्टनंतर 'भूल भुलय्या २' चित्रपटातील मुख्य भूमिका कोणाच्या पदरी पडेल हे काळचं ठरवेल.