करिनासोबत फ्लर्ट करतानाचा कार्तिक आर्यनचा व्हिडिओ व्हायरल...

बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरने अलिकडेच फॅशन डिझाईनर मनीष मल्‍होत्राच्या फॅशन शो मध्ये हजेरी लावली होती

Updated: Mar 29, 2018, 11:21 AM IST
करिनासोबत फ्लर्ट करतानाचा कार्तिक आर्यनचा व्हिडिओ व्हायरल... title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरने अलिकडेच फॅशन डिझाईनर मनीष मल्‍होत्राच्या फॅशन शो मध्ये हजेरी लावली होती. यासाठी ती सिंगापूरला पोहचली. या शोमध्ये करिना कपूरसोबत अमृता अरोरा आणि कार्तिक आर्यन देखील सहभागी झाले होते. या इवेंटमधील पार्टीचा एक व्हिडिओ इंस्‍टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ पाहुन करिनाच्या चाहत्यांना चिंता वाटू लागेल. काही फॅन्सने तर व्हिडिओत सैफला टॅग करण्याची धमकी दिली आहे.

कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडिओ

कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या या व्हिडिओत कार्तिक, करिनासोबत डान्स करताना दिसत आहे. सेल्फी मोडमध्ये बनवलेल्या या व्हिडिओत तुम्हारी सुलू सिनेमातील बन जा तू मेरी रानी या गाण्यावर मुव्ज करताना दिसत आहेत. पण त्यातील कार्तिकचा अंदाज अनेकांना खटकला. तुम्हीही पहा हा व्हिडिओ...

 

Ban jaa tu meri Rani 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

इतक्या लोकांनी पाहिला व्हिडिओ

कार्तिकने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओला आतापर्यंत 9,36,032 व्हीव्यूज मिळाले आहेत. मनीष मल्होत्राचा हा शो आठवड्याच्या सुरूवातील सुरू झाला होता. ज्यात करिना सुंदर लहंग्यात दिसत आहे. तर कार्तिक ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

 

Jab we met

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

 

Walked for my fav @manishmalhotra05 With the Beautiful #KareenaKapoorKhan  #Singapore

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on