Karwa Chauth 2022 : प्रत्येक महिला पतीच्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास (karwa chauth) करते. आज तो शुभ दिवस आहे, जेव्हा पत्नी आपल्या पतीसाठी निर्जल उपवास करतात. आपण कायम ऐकतो की फक्त पत्नी हा उपवास करतात, काही पती देखील आपल्या पत्नीच्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात (husbands Karwa Chauth fast). एवढंच नाही तर, काही सेलिब्रिटी पती देखील त्यांच्या पत्नीसाठी करवा चौथचा कडक उपवास करतात. कोण आहेत ते रियल 'हिरो' जाणून घेवू (celebrity husbands Karwa Chauth fast)
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (Deepika - Ranveer)
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer singh) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी (Power couple of Bollywood) एक आहेत. दीपिका आणि रणवीर (Deepika - Ranveer) एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत. नुकताच दीपिकाचा पती असल्यामुळे रणवीरने मी भाग्यवान असल्याचं सर्वांसमोर सांगितलं होतं. एक मुलाखतीत रणवीरने मी दीपिकासाठी करवा चौथचा उपवास करत असल्याचं सांगितलं होतं.
आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप (Ayushmann Khurrana-Tahira Kashyap)
अभिनय, गायक, डान्स अशा सर्व कला अंगी असलेला आयुष्मान खुराना पत्नी ताहिरा कश्यपवर प्रचंड प्रेम करतो. आयुष्मानने 2018 साली एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये त्याने हातावर ताहिरा असं लिहिलं होतं.
अनुष्का शर्मा-विराट कोहली (Anushka Sharma-Virat Kohli)
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. विराट देखील पत्नी अनुष्कासाठी करवा चौथचा उपवास करतो. या गोष्टीचा खुलासा त्याने करवा चौथचा एक फोटो पोस्ट करत केला.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan and Aishwarya Rai)
अभिषेक ऐश्वर्यासाठी करवा चौथचा उपवासही ठेवतो. खुद्द अभिषेकने एका मुलाखतीत याची कबुली दिली होती. अभिषेकने असंही सांगितलं होतं की, उपवासाच्या वेळी तो 24 तास उपाशी होता, कारण तो सरगी खायला विसरला होता.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty and Raj Kundra)
शिल्पा शेट्टी ही अशी अभिनेत्री आहे जी कायम परंपरा जपताना दिसते. करवा चौथचा उपवास फक्त शिल्पा करत नाही तर पत्नीच्या दिर्घायुष्यासाठी राज देखील करवा चौथचा उपवास करतो.