नेहा कक्करनं असं साजरा केलं पहिलं करवा चौथ

सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल   

Updated: Nov 5, 2020, 08:38 AM IST
नेहा कक्करनं असं साजरा केलं पहिलं करवा चौथ
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अ़डकलेल्या गायिका नेहा हिनं बुधवारी तिचं पहिलं करवा चौथ साजरा केलं. पती- पत्नीच्या नात्यात अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या या सणामुळं त्यांच्याही नात्याला एक वेगळं वळण मिळालं. 

सोशल मीडियावर या क्षणांचे काही खास व्हिडिओ शेअर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. जिथं नेहा आणि रोहनप्रीत या दोघांच्याही लूकनं सर्वांची मनं जिंकली. 

लाल रंगाच्या सूटमध्ये नेहानं तिचा लूक साकारला होता. तर, सिंदूर, हातात भरलेला लाल रंगाचा चूडा आणि मेहंदीमुळं तिचं सौंदर्य आमखी खुलून आल्याचं इथं पाहाय़ला मिळालं. नेहाप्रमाणंच रोहनप्रीतनंही सुरेख पेहरावाला प्राधान्य दिलं होतं. 

 

 

पहिल्यावहिल्या करवा चौथचा व्हिडिओ पोस्ट करत, रोहनप्रीतनं त्यासोबत एक कॅप्शनही लिहिलं. 'या व्हिडिओसाठी फार वाट पाहावी लागली होती....', असं लिहित आतापर्यंत आपण अनेक जोडप्यांचे व्हिडिओ पाहिले होते, पण आता अखेर स्वत: नेहासोबतचा व्हिडिओ पोस्ट करत असल्याचा आनंद त्यानं व्यक्त केला.