कतरिनानं सलमानचा गळा धरला... भर शूटमधून तडकाफडकी निघाला आणि... पाहा व्हिडीओ

कतरिनानं भर शूटमध्ये सलमानचा गळा धरला... लग्नानंतर 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Updated: Feb 5, 2022, 08:03 PM IST
कतरिनानं सलमानचा गळा धरला... भर शूटमधून तडकाफडकी निघाला आणि... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कतरिना नुकतंच तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. विकीसोबत तिचं लग्न आणि त्यानंतरचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या व्हिडीओची आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. आता कतरिना आणि सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चक्क चाहत्यांना धक्काच बसला आहे. 

कतरिना या व्हिडीओमध्ये सलमानसोबत डान्सचा सराव करताना दिसत आहे. मात्र त्याच दरम्यान तिला राग आल्याने अचानक ती रागाच्या भरात जे करते ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. 

पहिल्यांदी कतरिनाचा सराव सलमानला आवडत नाही म्हणून तो निघून जातो. त्यानंतर पुन्हा येतो तेव्हा कतरिना चक्क सलमानचा गळा दाबते असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ टायगर शूटिंग दरम्यानचा असल्याचं दिसत आहे. 

या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देखील येत आहेत. थ्रो बॅक व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. कतरिनाच्या लग्नानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा समोर आल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सलमान आणि कतरिना या दोघांची एक था टायगर सिनेमातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. 'माशाल्लाह' या गाण्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash Raj Films (@yrf)