विकी नसताना कतरिनासोबत ही खास व्यक्ती कोण? विश्वास बसणार नाही पण हे खरंय...

सध्या तो पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरमध्ये आहे 

Updated: Jan 5, 2022, 01:20 PM IST
 विकी नसताना कतरिनासोबत ही खास व्यक्ती कोण? विश्वास बसणार नाही पण हे खरंय... title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने 9 डिसेंबर रोजी विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर दोन्ही स्टार्स जुहू येथील त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले. आतापर्यंत, विकी आणि कतरिनाच्या या नवीन घराचे फारसे फोटो सोशल मीडियावर पाहिले गेले नाहीत, पण आता कतरिना कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी तिच्या नवीन घराची खास झलक दाखवली आहे.

नुकतेच कतरिना कैफने इन्स्टा स्टोरीवर अनेक छायाचित्रे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना तिच्या होम स्वीट होमची सफर घडवली आहे.कतरिना कैफने पहिल्यांदा तिच्या घरातून दिसणार्‍या सुंदर दृश्याची झलक शेअर केली. तिने अगदी समुद्रासमोरील अपार्टमेंट घेतले आहे, त्यामुळे तिच्या बाल्कनीतून सुंदर समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. हा फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले - dusk 

यानंतर कतरिनाने घरातील तिच्या आवडत्या भागाचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत कतरिनाने लिहिले - My Cosy Corner

घरातील तिच्या खास कोपऱ्यातील फोटो शेअर करत तिने खास व्यक्तींची ही झलक दाखवली. या फोटोत तिची मैत्रिण यास्मिन कराचीवाला दिसत आहे.

 

चौथ्या फोटोमध्ये, कतरिना कैफ तिच्या नवीन घराच्या बाल्कनीत तिच्या आईसोबत उभी असलेली दिसत आहे.कतरिना कैफ सध्या मुंबईत कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

 

लग्नानंतर काही दिवसांनी विकी कौशल त्याच्या कामात व्यस्त झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या तो पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरमध्ये आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे.