कतरिनाला सोडून विकी कोणासोबत फिरतोय? फोटोमध्ये दिसणारी ती महिला कोण?  

विकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Updated: Jan 24, 2022, 08:44 PM IST
कतरिनाला सोडून विकी कोणासोबत फिरतोय? फोटोमध्ये दिसणारी ती महिला कोण?   title=

मुंबई : विकी कौशल इंदूरमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत होता. कतरिना कैफही काही दिवसांपूर्वी विकीला भेटण्यासाठी इंदूरला गेली होती. तिथले कतरिना आणि विकीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या वीकेंडलाही कतरिना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यानंतर कतरिना विक्कीला भेटण्यासाठी इंदूरला गेल्याची चर्चा होती. पण कतरिनाच्या ताज्या फोटोंनी सगळ्यांची बोलती बंद केलीये.

कतरिनाची इंस्टा पोस्ट व्हायरल
कतरिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीवमध्ये मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या संपूर्ण फोटोत विकी कुठेच दिसत नाही. आता चाहत्यांना प्रश्न पडलाय की, विकी कुठे आहे? तर दुसरीकडे, विकीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेसोबत दिसत आहे. विकीचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते विक्की आणि कतरिना यांच्यात कोणती महिला आली याकडे आश्चर्याने पाहत आहेत. ज्यात विकी त्या महिलेला जवळ घेत फोटो काढण्यात आलाय. एकीकडे कतरिना वेकेशन एन्जॉय करतेय. तर दुसरीकडे एका महिलेसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलयं

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 ज्या चित्रपटाचं विकी इंदूरमध्ये शूटिंग करत होता. आता त्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाचं रॅपअप पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या रॅपअप दरम्यान विकी कौशलचा महिलेसोबतचा फोटो काढण्यात आला आहे. चित्रातील महिला एक थिएटर आर्टिस्ट आहे. प्रतीक्षा मयार असं या महिला कलाकाराचं नाव आहे. ती एक youtuber देखील आहे. अनेकदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.