मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफने डिसेंबर महिन्यात लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांत त्यांनी कामाला देखील सुरूवात केली. पण सणांना दोघे एकमेकांना एकटं सोडत नाहीत. ख्रिसमससाठी विकी शुटिंगसोडून कतरिनाला भेटायला आला. त्यानंतर दोघांनी लग्नानंतर पहिली लोहरी देखील एकत्र साजरी केली.
एवढंच नाही तर दोघे एकमेकांच्या आवडी-निवडीकडे देखील विशेष लक्ष देतात. आता देखील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता व्हायरल होत असेलला फोटो खुद्द विकीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला.
कतरिना पती विकीची चांगली काळजी घेत असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होते. दरम्यान, सध्याच्या घडीला कतरिना आणि विकी ही जोडी चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी जाऊन बसली आहे.
या दोघांचीही केमिस्ट्री आणि त्यांच्या नात्यातील काही खास क्षण पाहता जणू आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जीवनातील आनंद आपण अनुभवतोय अशीच भावना चाहत्यांच्या मनात असते.