कॅटरिना कैफ या 'क्युट' मुलासोबत ट्रेनमध्ये डेट एन्जॉय करतेय ...

9 डिसेंबरला मुंबईत राणी मुखर्जीच्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Updated: Dec 10, 2017, 08:09 PM IST
कॅटरिना कैफ या 'क्युट' मुलासोबत ट्रेनमध्ये डेट एन्जॉय करतेय ...  title=

 मुंबई : 9 डिसेंबरला मुंबईत राणी मुखर्जीच्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आजकाल सेलिब्रिटींपेक्षा स्टार किड्सचे फोटो इंटरनेटवर झपटट व्हायरल होतात.  

 
 तैमुरचे नवे सवंगडी 

 
 करिना आणि करण जोहर यांच्यामध्ये घट्ट सैख्य आहे. आता ही मैत्री एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाताना दिसत आहे. 
 
 करिना कपूरचा तैमुर करण जोहरच्या यश आणि रूही जोहर सोबत खेळताना दिसला. तिघांमधील निरागस भाव फोटोमध्ये अचूक टिपण्यात आले आहेत. 
 

 

 तिघांचे अनेक फोटो इंटरनेटवर झपाट्याने शेअर होत आहेत. अनेकजण या तिघांचे फोटो शेअर करत आहेत.

  
 अहिल मात्र कॅटरिनासोबत  

 
 सलमान खानचा भाचा अहिल मात्र मित्रांपेक्षा कॅटरिनासोबत रमला होता.  खान कुटुंबियांच्या जवळची असणारी कॅटरिना अहिलला घेऊन टॉय ट्रेनमध्ये बसली होती. अहिलला खेळवण्यासाठी तिच्या हातात फुग्याची कॅन्डीदेखील होती.  

 
 अर्पिताने शेअर केला व्हिडिओ 

 

 

Ahil’s date at Adira’s party @katrinakaif 

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

 

  अर्पिता खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अहिल आणि कॅटरिनाचा खास फोटो शेअर केला. त्याखाली राणी मुखर्जीच्या मुलीच्या बर्थ डेमध्ये अहिल कॅटरिनासोबत डेटवर अशा आशयाची कॅप्शन लिहली होती.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x