VIDEO: WWE रिंगमध्ये उतरला हिट अँड फिट वरुण धवन

दुसरीकडे 'जुडवा २' स्टार वरुण धवन दिल्लीत WWE फाईटचा आनंद घेताना पहायला मिळाला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 10, 2017, 08:11 PM IST
VIDEO: WWE रिंगमध्ये उतरला हिट अँड फिट वरुण धवन  title=
Image: Instagram

नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार्स ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपली चमक दाखवतात. एकीकडे अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी आदिराच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. तर, दुसरीकडे 'जुडवा २' स्टार वरुण धवन दिल्लीत WWE फाईटचा आनंद घेत होता.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ९ डिसेंबर रोजीच्या WWE लाईव्ह इंडिया टूरमध्ये अभिनेता वरुण धवनने उपस्थिती लावली. यावेळी अभिनेता वरुण धवनने किंग ऑफ किंग्ज जिंदल महल आणि ट्रिपल एच यांचीही भेट घेतली.

इतकचं नाही तर वरुण WWE रेसलिंगच्या स्टेजवरही गेला. यावेळी वरुण धवनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळत होता. वरुणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

या व्हिडिओत वरुण रिंगच्या मधोमध पहायला मिळथ आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत वरुणने एक कॅप्शनही लिहीलं आहे.

 

First time in a wrestling ring with a passionate Delhi crowd. Gimme a hell yeah. Had a great time @wwe

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

वरुणने लिहिलं आहे की, दिल्लीत पहिल्यांदाच एका पॅशनेट क्राऊडसोबत रेसलिंग रिंगमध्ये उपस्थित आहे. हा क्षण खूपच खास आहे.

 

With the game #HHH #legend. Thank you for the seats hunter @tripleh

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

इतकचं नाही तर वरुणने आपल्या अकाऊंटवरुन दोन फोटोजही पोस्ट केले आहेत. यामध्ये वरुण धवन हा ट्रिपल एचसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये वरुण लिहितो, 'गेमसोबत #ट्रिपलएच #लेजंड'.

तर, दुसऱ्या फोटोमध्ये वरुण धवन हा जिंदर महलसोबत दिसत आहे.