कॅटी पेरीचा परफॉर्मन्स ते रणवीरनं ऑरीला उचलून गुरु रंधावाच्या गाण्यावर केलेला डान्स; अंबानींच्या क्रुझ पार्टीचे VIDEO VIRAL

Katy Perry and Guru Randhawa at Anant Radhika Pre-Wedding : कॅटी पेरी आणि गुरु रंधावाच्या गाण्यांवर थिरकले सेलिब्रिटी... अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Jun 1, 2024, 02:01 PM IST
कॅटी पेरीचा परफॉर्मन्स ते रणवीरनं ऑरीला उचलून गुरु रंधावाच्या गाण्यावर केलेला डान्स; अंबानींच्या क्रुझ पार्टीचे VIDEO VIRAL title=
(Photo Credit : Social Media)

Katy Perry and Guru Randhawa at Anant Radhika Pre-Wedding : गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलका अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची चर्चा आहे. काल रात्री त्यांच्या प्री-वेडिंगमध्ये गुरु रंधावा आणि कॅटी पेरीनं परफॉर्म केलं. त्या कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

तीन दिवस सुरु असलेल्या या क्रुझ पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही सेलिब्रिटींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून काही झलक दाखवली. तर काही सेलिब्रिटींच्या फॅन पेजनं व्हिडीओ शेअर केले. त्यातील काही व्हिडीओत कॅटी पेरी ते गुरु रंधावा  यांच्या परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. 

एका व्हिडीओत गुरु रंधावा हा परफॉर्म करत आहे. तर त्यावेळी स्टेजवर त्याला परफॉर्म करताना पाहून रणवीर सिंगला राहिलं नाही आणि तो थेट स्टेजवर जाऊन डान्स करु लागला. यावेळी गुरु रंधावा हा स्टेजवर 'आज फिर किथे चली है मोरनी बनके' हे त्याचं लोकप्रिय गाणं गात होता. फक्त रणवीर नाही तर त्यासोबत वीर पहाडिया आणि ऑरी देखील डान्स करत होते. तर या व्हिडीओत रणवीर सिंग हा ऑरीला उचलून डान्स करताना दिसला. 

Ranveer, Veer Paraiya, Orry for after party with Guru Randhawa
byu/Shabudana_khichdi inBollyBlindsNGossip

याशिवाय आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात कान्समध्ये होत असलेल्या आतिशबाजीसोबत हॉलिवूडची टॉपच्या गायिकांपैकी एक असलेल्या कॅटी पेरी गाणं गाताना दिसली. कॅटीनं काल 31 मे रोजी कान्स प्री-वेडिंग पार्टीत परफॉर्म केलं. त्याप्रमाणे संध्याकाळी जो कार्यक्रम झाला त्याचं नाव मस्के रेड बॉल में शाम को LA Vite E Viaggio (लाइफ इज अ जर्नी) असं होतं. त्यात कॅटी पेरीनं परफॉर्म केलं. तिचा परफॉर्मन्स पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक आनंदानं तिच्यासोबत गाऊ लागले. 

हेही वाचा : सारा नाही, 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करतोय शुभमन गिल? अखेर तिनेच केला खुलासा

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग विषयी बोलायचे झाले तर त्यांचं पहिलं प्री-वेडिंग हे गुजरातच्या जामनगरमध्ये झालं होतं. आता इटली ते फ्रान्स असा समुद्रातून एका लग्झरीयस क्रुझवर हे दुसरं प्री-वेडिंग करण्यात आलं आहे. हे दुसरं प्री-वेडिंग 29 मे ला सुरु झालं आणि 1 जून म्हणजे आज दुपारी संपणार आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. सलमान खान, शाहरुख खानचं संपूर्ण कुटुंब ते रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सारा अलू खानपासून अनेक सेलिब्रिटी या पार्टीत शामिल झाले आहेत.