पाहा कोण आहे 'तो' ज्याची प्रेमकहाणी ऐकण्यासाठी बिग बीसुद्धा उत्सुक

....परिस्थिती जरा वेगळी आहे

Updated: Oct 25, 2019, 09:26 PM IST
पाहा कोण आहे 'तो' ज्याची प्रेमकहाणी ऐकण्यासाठी बिग बीसुद्धा उत्सुक

मुंबई : आजारपणातून सावरल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा त्यांच्या कामांवर लक्ष देऊ लागले आहेत. विविध कार्यक्रम आणि चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये आता ते व्यग्र झाले आहेत. कलाविश्वातील काम, वावर आणि खासगी आयुष्य यांमुय़ळे बिग बींविषयी प्रेक्षकांना फारच उत्सुकता असते. पण, तुम्हाला माहित आहे का? खुद्द बिग बींनाही अशा काही गोष्टींप्रती उत्सुकता आहे. याच काही गोष्टींपैकी एक म्हणजे एका चाहत्याची प्रेमकहाणी. 

सहसा चाहत्यांना सेलिब्रिटींच्या प्रेमकहाणीपोटी कमालीची उत्सुकता आणि कुतूहल असतं. पण, इथे मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात आलेल्या एका स्पर्धकाची प्रेमकहाणी ऐकताना अमिताभ बच्चन हे त्यात बरेच रमलेले दिसले. यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टही केला गेला आहे. 

मुळच्या बिहारच्या असणाऱ्या कुमार रंजन नामक स्पर्धकाने थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोरच आपली धमाल अशी प्रेमकहाणी सांगितली. जवळपास दहा वर्षांपर्यंत चाललेल्या या प्रेमकहाणीत अखेर लग्नाचं वळण आलं होतं. शिकवणीच्या वेळीच तिला आपण पाहत असायचो, ज्या दिवशी ती दिसायची नाही तेव्हा काहीतरी चुकत असल्याची भावना उगाचच मन घर करुन जायची असंही त्या चाहत्याने/ स्पर्धकाने सांगितलं. 

प्रेमाची गोष्ट सांगतेवेळी कुमार रंजनच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून बिग बीही मोठ्या उत्सुकतेने तो काय सांगतोय याकडे लक्ष देत असल्याचं दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱं स्मितहास्य आणि त्यानंतर या खास प्रेमकहाणीपोटीची त्यांची उत्सुकता पाहून तो स्पर्धकही चकित झाला असणार यात शंकाच नाही.