'मला पाचवा महिना सुरु होता अन्...', कविता लाड यांनी सांगितला रंगमंचावरील 'तो' किस्सा

Kavita Lad Medhekar : कविता लाड मेढेकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी रंगमंचावरील 'तो' किस्सा सांगितला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Apr 5, 2024, 03:01 PM IST
'मला पाचवा महिना सुरु होता अन्...', कविता लाड यांनी सांगितला रंगमंचावरील 'तो' किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Kavita Lad Medhekar : छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर जवळपास दहा वर्ष राज्य केलं. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा केली. याच मालिकेतील अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांचे आजही लाखो चाहते आहेत.  दरम्यान, कविता यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगा दरम्यानचा एक खास किस्सा सांगितला आहे. 

कविता यांनी ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ या सोहळ्यात हदेरपी लावली होती. त्यावेळी हा किस्सा सांगत कविता म्हणाल्या, "माझी सगळ्यात आवडती कला ही नाटक आहे. याच रंगभूमीमुळे माझ्या मनात अभिनयाची एक वेगळी गोडी निर्माण झाली आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की माझ्या पहिल्या मुलाच्या वेळी रंगमंचावर घडलेला एक प्रसंग माझ्या आजही लक्षात आहे. प्रेग्नंसीच्या काही महिन्यांनंतर मी नाटकातून ब्रेक घेतला. खरंतर, मातृत्व अनुभवण्यासाठी मी ब्रेक घेण्याचं ठरवलं होतं. तर याविषयी मी आमचे निर्माते सुधीर भट यांना सांगितलं की मी आता नाटक सोडतेय त्यामुळे लवकर तुम्ही माझ्यासाठी रिप्लेसमेंट बघा." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर पुढे कविता म्हणाली, "नवीन मुलीची रिहर्सल ही मला चौथा महिना सुरु झाला तरी सुरुच होती. एकदिवस मी सुधीर काकांना सांगितलं. आता मला नाही जमत... पाचवा महिना लागणार आहे तर आपण थांबूया. तर या सगळ्यात पाचव्या महिन्यात गेल्यानंतर चिंचवडला या नाटकाचा शेवटचा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्याचं कारण म्हणजे माझ्या मनात असलेला एकच विचार की आता मी आराम करणार. त्या सगळ्यामुळे मनात मी आनंदी होते. त्यानंतर पुन्हा काम करणार नाही याचा विचार सुद्धा सुरु होता."

हेही वाचा : मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार?

अखेरचा प्रयोग अन् अश्रू अनावर...

शेवटच्या प्रयोगाविषयी सांगत असताना कविता पुढे म्हणाल्या, "शेवटच्या प्रयोगाच्या तिसऱ्या घंटानंतर माझी एन्ट्री होती. तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की ही माझी स्टेजवर असलेली शेवटची एन्ट्री असेल, कारण यानंतर मी पुन्हा कधी रंगभूमीवर येणार? याची मला काहीही कल्पना नाही. नाटक सुरु झालं आणि प्रत्येक वाक्यानंतर ‘हे शेवटचं…हे शेवटचं’ असं चक्र माझ्या डोक्यात चालू होतं. प्रशांत, मंदा देसाई यांना माझ्या भावना कळून चुकल्या होत्या. तो प्रयोग संपला पडदा पडला आणि मला अश्रू अनावर झाले. पण मी का रडते याचं कारण मलाच कळेना. कारण नक्की काय विचार आहे नाटक सोडणार यामुळे रडते की पुढे काय होणार या विचारानं रडायला येतंय हेच कळत नव्हतं. आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी त्याच नाटकात मी मनी म्हणून एन्ट्री घेतली. शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग माझी प्रेक्षकांमधून एन्ट्री झाली आणि त्या क्षणाला वाटलं हे सगळे प्रेक्षक आपले आहे आणि ते आपल्या बाजूनं आहेत. ते मी कधीच विसरणार नाही.”

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x