KBC 12 मध्ये ५० लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला, २५ लाख जिंकला पण नंतर...अमिताभही दु:खी झाले...कारण

कौन बनेगा करोड़पति-12 मध्ये अमिताभ बच्चन यांनी सर्वांचं स्वागत केलं. नव्या फास्टेस्ट फिंगर कंटेस्टेंट्स सोबत बिग बी यांनी केबीसी-12

Updated: Nov 3, 2020, 10:21 PM IST
KBC 12 मध्ये  ५० लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला, २५ लाख जिंकला पण नंतर...अमिताभही दु:खी झाले...कारण title=

मुंबई : कौन बनेगा करोड़पति-12 मध्ये अमिताभ बच्चन यांनी सर्वांचं स्वागत केलं. नव्या फास्टेस्ट फिंगर कंटेस्टेंट्स सोबत बिग बी यांनी केबीसी-12 ची सुरूवात केली. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये विचार गेलेल्या प्रश्नाचं उत्तर सौरभ कुमार साहू यांनी वेगाने दिलं. सर्वात वेगाने उत्तर दिल्यानंतर सौरभ कुमार साहू हे हॉट सीटवर बसले.

कौन बनेगा करोड़पति-12 मध्ये हॉटसीटवर पोहोचलेले सौरभ कुमार साहू हे उत्तर प्रदेशातील बदायूंचे आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराला अनेक दिवसांपासून वाटत होतं की, त्यांनी केबीसीमध्ये भाग घ्यावा, आता त्यांची इच्छा पूर्ण झाली. सौरभ कुमार यांचं वय २७ वर्ष आहे. 

सौरभ हे त्यांचे भाऊ गौरव यांच्यासह शोमध्ये आले आहेत, त्यांचा भाऊ त्यांच्यासारखाच दिसतो, यावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी देखील विचारुन झालं आहे. तुम्ही जुळे भाऊ आहात का? यावर सौरभने सांगितलं असं नाहीय, पण अनेकांना तसं वाटतं.

पहिल्याच प्रश्नात सौरव कुमारने घेतली लाईफलाईन

केबीसी-12 मध्ये हॉट सीटवर बसलेले सौरभ कुमार साहू हे ओएनजीसीमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. सौरभने पहिल्याच प्रश्नात एक लाईफ लाईन घेतली। सौरभने १ हजार रूपये जिंकण्यासाठी ५०-५० लाईफलाईनचा उपयोग केला. खरंतर याचा कुणालाही अंदाज नव्हता की, सौरभ एवढा चांगला गेम खेळेल आणि २५ लाख रूपयांपर्यंत जिंकेल.

चार लाईफलाईन संपल्यानंतरही सौरभ कुमार साहू ५० लाख रूपयांचा प्रश्नावर पोहोचले. योग्य उत्तर माहित नसल्याने त्यांनी गेम खेळला आणि उत्तर चुकल्याने ३ लाख २० हजारावर आले. सौरभला हरताना पाहून अमिताभ बच्चन देखील दु:खी झाले.

तर खाली पाहा ५० लाख रूपयांसाठी अमिताभ बच्चन यांनी सौरभ साहू यांना कोणता प्रश्न विचारला होता...

भारतात सर्वात जास्त वर्ष राज्यपालपदी राहण्याचा विक्रम कुणाच्या नावे आहे?

A. स्वराज कौशल
B. एनएन व्होरा
C. एम एम जॅकव
D. सुरजित सिंह बर्नाला

सौरभकुमार साहूने याचं उत्तर दिलं D. सुरजित सिंह बर्नाला. बर्नाला हे उत्तर चुकीचं आलं, या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं, C. एम एम जॅकव.

आईसाठी घर खरेदी करु इच्छित होते, सौरभकुमार साहू

सौरभ कुमार साहूने कौन बनेगा करोड़पति-12 मध्ये सांगितलं की, ते आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पैशांचा उपयोग करणार आहेत. सौरभ या पैशातून आपल्या आईला नवीन घर खरेदी करून देणार होते. अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना सौरभ कुमार साहू सांगत होते की, त्यांचे वडील त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत. 

सौरवच्या वडिलांनी खूप प्रयत्न केल्यानंतर वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली, त्यांनी अशावेळी नोकरी मिळवली की, जेव्हा लोक म्हणत होते, या मुलाच्या नोकरीचं आता वय गेलं. पण त्यांच्या वडिलांनी नैराश्य जवळ न येऊ देता स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं.