Rajkumar Hirani Munna Bhai 3 : बॉलिवूडचे दिग्ग्ज दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्ररट दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे संजय दत्त आणि अरशद वारसीनं मिळून त्यांनी मुन्ना भाई एमबीबीएस बनवला होता. हाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी या चित्रपटाचा सीक्वल बनवला त्याचं नावं 'लगे रहो मुन्ना भाई' असं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 18 वर्ष झाले आहेत. आता या चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार असा प्रश्न अनेकांना असला तरी त्याचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. राजकुमार हिरानी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की आजवर ते मुन्ना भाई - 3 का घेऊन येऊ शकले नाही आणि त्यांना पुढचा भाग घेऊन येण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अनवीलिंग ऑफ स्क्रीन कार्यक्रमात राजकुमार हिरानी यांनी सांगितलं की मुन्ना भाईसाठी माझ्याकडे पाच स्क्रिप्ट आहेत, पण त्या पाचही अर्धवट आहेत. मी प्रत्येक स्क्रिप्टवर जवळपास 6 महिन्यांचा काळ दिला. पण तरी देखील पुढे त्याचं काही होऊ शकलं नाही. त्यामुळे मुन्ना भाई एलएलबी, मुन्ना भाऊ चल बसे, मुन्ना भाई चले अमेरिका आणि अशा आणखी स्क्रिप्ट आहेत. राजकुमार हिरानी यांनी पुढे सांगितलं की पुढचा भाग बनवण्यात सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आगामी चित्रपटाला त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा सगळ्यात जास्त चांगलं असायला हवं.
यावेळी राजकुमार हिरानी यांना प्रश्न विचारण्याता आला की याचा अर्थ मुन्ना भाईचा तिसरा पार्ट कधीच पाहायला मिळणार नाही का? तर राजकुमार हिरानी यांनी आशा देत सांगितलं की त्यांच्याकडे एक कल्पना आहे की ज्याविषयावर चित्रपट बनवता येऊ शकतो. त्यामुळे सगळेमिळून त्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. बनवलेल्या राजकुमार हिरानी यांनी सांगितलं की 'माझ्याकडे आता एक अगदी वेगळी आयडया आहे. सगळ्यांनात माहित आहे की चित्रपटानं या 100 वर्षांमध्ये सगळं काही सांगितलं आणि दाखवलं आहे. पण एक आयड्या आहे ज्यावर मी सध्या काम करतोय.'
हेही वाचा : 18 वर्ष मोठ्या मुस्लिम व्यक्तीशी केलं लग्न, तर पारसी समुदायानं दाखवला बाहेरचा रस्ता; मग 8 वर्ष लहान प्रियकराशी थाटला संसार
राजकुमार हिरानी यांनी असं काही सांगितलं की जे ऐकल्यानंतर चाहत्यांना हसू अनावर झालं. त्यांनी सांगितलं की 'मला वाटतं की संजू कधी घरी येऊन मला धमकी देईल की मुन्ना भाईचा पुढचा भाग बनवं. त्याची इच्छा आहे की या चित्रपटाच्या पुढच्या भागावर काम करायला हवा.' तर राजकुमार हिरानी यांनी सांगितलं की 'खूप गंभीरतेनं पुढच्या भागावर काम करत आहेत.' राजकुमार यांचे सगळेच चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.