KBC 13 : ‘या’ सोप्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने गमावले 7 कोटी; तुम्ही याचं उत्तर सहज देऊ शकता?

पाहा काय होता 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न?  

Updated: Aug 31, 2021, 10:30 PM IST
KBC 13 : ‘या’ सोप्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने गमावले 7 कोटी; तुम्ही याचं उत्तर सहज देऊ शकता?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ‘कौन बनेगा करोड़पती’ सीजन 13 (Kaun Banega Crorepati Season 13) या रिअॅलिटी शोची भलतीच चर्चा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरु आहे. इथं येणाऱ्या स्पर्धकांची संघर्षगाथा कार्यक्रमाला वेगळ्याच वळणावर नेऊन जात आहे. अशातच या कार्यक्रमात एक अशी स्पर्धक आली, जिनं अनेक आव्हानांवर, अंधत्वावर मात करत डोळस कामगिरी केली आणि भल्याभल्य़ांना लाजवलं. 

नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये हिमानी बुंदेला नावाच्या या स्पर्धकानं 50 लाख रुपये जिंकले होते. सर्व लाईफलाऊन वापरल्यानंतर नव्या दिवशी तिनं या प्रश्नमंजुषासम स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत 1 कोटी रुपये जिंकले. पण, 7 कोटींचा पल्ला गाठणं मात्र तिला शक्य झालं नाही. 

सर्व लाईफलाईन वापरल्यानंतर हिमानीला बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारला ज्याचं तिनं अगदी योग्य उत्तर दिलं. पुढे 7 कोटी रुपयांच्या बक्षीसासाठी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 

काय होता 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न? 
डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याद्वारे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये सादर करण्यात आलेल्या थिसिसचं शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना 1923 मध्ये डॉक्टरेट ही मानद उपाधी देण्यात आली होती? 

या प्रश्नासाठी हिमानीला द वांट्स एंड मीन्स ऑफ इंडिया, द प्रॉब्लम ऑफ रूपी, नेशनल डिविडेंट ऑफ इंडिया आणि द लॉ ऑफ लॉयर असे पर्याय देण्यात आले होते. ‘द प्रॉब्लम ऑफ रूपी’ असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. हिमानीनं मात्र या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यामुळं स्पर्धेतून काढता पाय घेतला आणि तिथंच एका स्वप्नाच्या आशा मावळल्या. हिमानी ही केबीसीमधील आतापर्यंतची सर्वात पहिली दृष्टीहीन स्पर्धक आहे. तिच्या जिद्दीला सध्या सर्वच स्तरांतून सलाम ठोकला जात आहे. 7 कोटींचं बक्षीस नव्हे, तिनं जिंकली 7 कोटी नागरिकांची मनं....