First Look: अक्षय कुमारने सुरू केलं सारागढी युद्धावर आधारित सिनेमाचं शूट

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर त्याचा ‘२.०’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो. अशातच त्याच्या पुढील ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 

Updated: Jan 5, 2018, 02:24 PM IST
First Look: अक्षय कुमारने सुरू केलं सारागढी युद्धावर आधारित सिनेमाचं शूट title=

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर त्याचा ‘२.०’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो. अशातच त्याच्या पुढील ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 

अक्षय कुमार याने स्वत: या सिनेमाचा पहिला लूक सोशल मीडिया शेअर केला आहे. हा लूक शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘मला हा फोटो तुमच्यासोबत शेअर करताना गर्व होत आहे. मी नव्या वर्षाची सुरूवात केसरीने करत आहे. हा माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. जो मी पूर्ण मेहनतीने करणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्यात’.

अक्षय कुमारने या सिनेमाची घोषणा २०१७ मध्ये सुरू केली होती. हा सिनेमा आधी अक्षय कुमार, करण जोहर आणि सलमान खान एकत्र तयार करणार होते. हा सिनेमा बॅटल ऑफ सारागडी वर आधारित आहे. आता सलमान या प्रोजेक्टमधून बाहेर पडला असून आता केवळ करण जोहर आणि अक्षय यात आहेत. 

बॅटल ऑफ सारागढी वर आधारित तीन सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार होत आहेत. एका सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. तर दुस-यात अक्षय कुमार आहे. तर तिस-या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.