केजीएफ स्टार 'यश'वर लग्नात ढोल वाजवायची वेळ, VIDEO मागचं सत्य काय

केजीएफ स्टार यशचा 'KGF Chapter 2' हा सिनेमाचा चांगलाच ब्लॉकबास्टर ठरला होता.

Updated: Jul 26, 2022, 12:38 PM IST
 केजीएफ स्टार 'यश'वर लग्नात ढोल वाजवायची वेळ, VIDEO मागचं सत्य काय title=

मुंबई : केजीएफ स्टार यशचा 'KGF Chapter 2' हा सिनेमाचा चांगलाच ब्लॉकबास्टर ठरला होता.या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्डसं मोडले होते. तब्बल रिलीजच्या महिन्याभराहून अधिक दिवस हा चित्रपट सिनेमागृहात चालत होता.या चित्रपटानंतर आता KGF च्या तिसऱ्या चॅप्टरची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. त्यात आता य़शचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस होत आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.  

व्हिडिओत काय ? 
यशचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो ढोल वाजवताना दिसत आहे. व्हिडिओत लांब केस आणि दाढी असलेल्या एका व्यक्तीने सोनेरी रंगाचे जॅकेट घातले आहे आणि लग्नात तो ढोल वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे रॉकी भाई ढोल का वाजवत आहेत असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. 

जर तुम्ही पहिल्या नजरेत हा व्हिडिओ पाहिलात तर मागून हा व्यक्ती केजीएफ स्टार यश सारखाच दिसतो.त्याची दाढी आणि बॉडी तशीच आहे.त्यामुळे सर्वांना तो रॉकी भाई वाटतोय. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की हा रॉकी भाई नसून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा माणूस आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकरी कमेंट करतायत. एका य़ुजरने  रॉकी भाईच्या स्टाईलमध्ये लिहिले की, ‘आय डोन्ट लाईक ढोल, बट ढोल लाइक्स मी’. तर आणखी एका यूजरने लिहिले, 'रॉकी भाई आफ्टर ऑल सोना समुद्रात बुडाला'. इतकंच नाही तर एका व्यक्तीने असंही लिहिलं की, 'मैदान कुठलंही असो, भाऊ इथेही सोन्याचं जॅकेट घातलं आहे'. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

केजीएफ चित्रपटाच्या दुसऱ्या चॅप्टरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, तर आता रॉकी भाई आणि त्याच्या स्टाईलची लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की आता त्याचे चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता कधी रिलीज होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.