राखी सावंतची तब्बेत जाणून घेण्यासाठी पोहोचला खली

पाहा हा व्हिडिओ 

राखी सावंतची तब्बेत जाणून घेण्यासाठी पोहोचला खली  title=

मुंबई : हरियाणात एका विदेशी रेसलर रेबलसोबत फाइट केल्यामुळे जखमी झालेली राखी सावंत आता अंबालाच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. फाइटच्या दरम्यान रेबलने राखीला उचलून जमिनीवर जोरात आपटल्यामुळे राखीच्या कंबरेला जबर मार बसला आहे. 

राखीचा हा विदेशी रेसलरसोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसा द ग्रेट खली राखी सावंतची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलमध्ये राखी आणि खली यांच्यात झालेला हा व्हिडिओ झी समुहाकडे एक्सक्युझिव आहे. 

पंचकूलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनरखाली आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनेक देसी-विदेशी रेसलर्सने सहभाग घेतला होता. या इव्हेंटचं प्रमोशन राखी सावंत आणि अर्शी खानने केलं. रविवार (11 नोव्हेंबर) एक मोठी फाइट झाली होती.  या इव्हेंटमध्ये पुरूष रेसलेरांसोबत महिला रेसलर्सही स्पर्धेत होत्या. अशाच एका स्पर्धेत एका विदेशी महिला रेसलरने खुलं आव्हान दिलं. 'जर कोणत्या भारतीय महिला रेसलरमध्ये दम असेल तर माझ्याशी फाइट करावी', असं ती म्हणाली.