खारी बिस्कीट चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजचा आगामी 'खारी बिस्कीट' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Aug 22, 2019, 07:18 PM IST
खारी बिस्कीट चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित title=

मुंबई : झी स्टुडिओजचा आगामी 'खारी बिस्कीट' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिमुरड्या भावंडांची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली, तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ नये आणि तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या खारीची ही गोष्ट आहे. फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची ही गोष्ट आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने ह्या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि अवघ्या दोन दिवसात १० लाखाहून जास्त हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर वेदश्री खाडिलकरने खारीची भूमिका साकारली आहे. सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.