Khatron Ke Khiladi 11 ग्रॅण्ड फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ठरला Khatron Ke Khiladi 11चा विजेता

Updated: Sep 22, 2021, 02:31 PM IST
Khatron Ke Khiladi 11 ग्रॅण्ड फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक

मुंबई: खतरों के खिलाडीच्या 11 व्या सीझनमध्ये रोहित शेट्टी होस्ट म्हणून दिसत आहे. या सीझनमधील सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ग्रॅण्ड़ फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक झालं आहे. या शोच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. ग्रॅण्ड फिनालेचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र त्यापूर्वीच विजेत्याचं नाव समोर आल्याने आता उत्सुकता संपणार का हे पाहावं लागणार आहे. 

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी टीव्ही शोचा 11 वा सीझनचा विजेता ठरल्याचं सांगितलं जात आहे. कलर्सच्या सुपरहिट रिअॅलिटी टीव्ही शोमधील सर्व स्पर्धकांना पराभूत करून अर्जुनने ही ट्रॉफी जिंकली. चित्रपट समीक्षक सलील कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'खतरों के खिलाडी 11 विजेता अर्जुन बिजलानीने ट्रॉफी जिंकली आहे!  अर्जुनचं खूप अभिनंदन! '

आमची सहयोगी वेबसाईट बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार अर्जुन बिजलानीचं संपूर्ण कुटुंब या विजयाचा आनंद साजरा करत आहे. अर्जुनच्या पत्नीने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन त्यांच्या कुटुंबासोबत पार्टी करत असल्याचं दिसत आहेत. अर्जुनच्या पत्नीने विजयाची ट्रॉफी आणि पार्टीतील पाहुण्यांचे सेलिब्रेट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सोशल मीडियावर अर्जुनच विजेता असल्याचे फोटो व्हायरल होताच सर्वत्र त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खतरों के खिलाडी शो तसा लोकप्रिय आहे. त्यामुळे या लोकप्रिय शोमध्ये अर्जुनने बाजी मारल्यानं त्याचं कौतुक होत आहे. अर्जुनने इश्क मे मरजावा, नागिन, परदेस मे है मेरा दिल, डान्स दिवाने शोमधून घराघरात पोहोचला आहे. आता अर्जुनने खतरों के खिलाडी शो जिंकून आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.