मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेत आहेत. अलीकडेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये या स्टार कपलच्या नात्याबद्दल अनेक खुलासे झाले होते. दरम्यान, कियाराने मौन सोडत आपली बाजू मांडली आहे.
'कॉफी विथ करण'मध्ये शाहिद-कियारा पोहोचले
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी करण जोहरच्या शोमध्ये पोहोचले. दोघांनीही त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. यादरम्यान कियारानेही सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्याबाबत मौन सोडले आहे.अभिनेत्री म्हणाली की, अर्थातच आम्ही मैत्रिच्या पुढे आहोत.'' मात्र कियाराने थेट काहीही सांगितलं नाही.
करण जोहरने थेट कियाराला विचारलं की, ती सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली की, मी नकार देणार नाही आणि होकारही देणार नाही. होय नक्कीच आम्ही मित्रांपेक्षा जास्त आहोत. अभिनेत्री पुढे म्हणाली की तिचा लग्नावर विश्वास आहे. मी माझ्या आजूबाजूला अनेक विवाह पाहिले आहेत आणि लवकरच तिला तिच्या आयुष्यातही हे घडलेले पाहायचं आहे.
चित्रपटाच्या शूटिंगपासून लव्हस्टोरीची सुरुवात झाली
सिद्धार्थ आणि कियारा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना पाहिलं आहे. अशा परिस्थितीत दोघंही बी-टाऊनमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत.शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचं प्रेम फुललं होतं.