किरण रावच्या 'या' सवयीला कंटाळला होता आमिर, बऱ्याच काळापासून दोघांमध्ये होता अबोला?

आमीरला पार्ट्यांचा शॉक नाही, त्याला गाणी ऐकण्याचं ही वेड नाही.

Updated: Jul 4, 2021, 07:27 AM IST
किरण रावच्या 'या' सवयीला कंटाळला होता आमिर, बऱ्याच काळापासून दोघांमध्ये होता अबोला?

मुंबई : आमिर खानने पुन्हा एकदा आपल्या संसाराचा दी एन्ड केलाये. पत्नी किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार संपवलाये. दोघांनी एकमताने हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फॉर्मल स्टेटमेंटमध्ये सांगितलंय.पण याआधी ही किरण आणि आमिरमध्ये मतभेद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आणि या गोष्टीला आमिर आणि किरणने जेव्हा करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली तेव्हा दुजोरा मिळाला. आमिरच्या सवयीबाबत किरणने काही धक्कादायक गोष्टीचा खुलासा यावेळी केला होता. 

किरणने करण जोहरच्या शोमध्ये आमिरच्या पहिल्या पत्नीचं नाव घेत म्हटलं, की 'जेव्हा आमिरने रिना दत्ता यांना घटस्फोट दिला , तेव्हा मला आमिरसोबत संसार सुरु करणं हे एक आवाहनचं होतं. आमिर सारख्या व्यक्तीसोबत राहणं कठीण होतं, कारण तो खूप वेगळा व्यक्ती आहे. आमिरला पार्ट्यांचा शॉक नाही, त्याला गाणी ऐकण्याचं ही वेड नाही.

पुढे किरण म्हणाली, सगळ्यांना वाटतं आमिर गंभीर स्वभावाचा व्यक्ती आहे. पण तो मनमिळावू व्यक्ती आहे.पण याउलट आमिरने एका मुलाखतीत आपल्या खाजगी जीवनाबद्दल काही गोष्टीचा खुलासा केला होता.

 आमिर म्हणाला, "किरणने मला रागात काही अशा गोष्टी बोलल्या होत्या , ज्यामुळे माझ्या वागण्यात बराच फरक पडला होता. तेव्हा किरण मला म्हणाली होती," कि खऱ्या आयुष्यात मी कोणाची परवा करत नाही. मला असं वाटतं तू माझ्यासाठी नाहीस. मी तुझ्या नियमांच्या वर्तुळात बसतच नाही. तु जरी माझ्यासोबत असलाच , तरी तुझं मन हे दुसरीकडेच नाही.

त्यामुळे असे काही मतभेद किरण आणि आमिर यांच्यात सुरु होते, पण अखेर दोघांना संसार बाजूला ठेवून आता एक पालक पुढे एकत्र जाण्याचा निर्णय घेतलाये.