मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं अतिशय भयावह रूप पाहायला मिळत आहे. आता अशी परिस्थिती आहे की. कोरोनाबाधितांना उपचार देखील मिळण कठिण झालं आहे. उपचारांकरता लागणारे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांच्या अभावामुळे रूग्ण रूग्णालयातच शेवटचा श्वास घेत आहेत. अभिनेत्री किरण खेर यांनी कोरोनाच्या या कठिण काळात मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाबाधितांच्या उपचाराकरता एक करोड रुपये दान केले आहेत.
आपल्याला माहितच आहे, किरण खेर स्वतः कॅन्सरशी झुंज देत आहेत. चंदीगडच्या खासदार आणि सिने अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या किरण खेर अतिशय संवेदनशील आहेत. किरण खेर यांच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक होत आहे.
कोरोनाबाधितांकरता व्हेंटिलेटर खरेदी करावे याकरता एक करोड रुपये दान केले आहेत. किरण यांनी ही संपूर्ण माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'आशा आणि प्रार्थनाकरत मी एमपी फंडमधून कोविड-19 रूग्णांकरता व्हेंटिलेटर खरेदी करण्याकरता PGI चंदीगडकरता 1 करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे.'
खासदार किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग झाला आहे. सध्या मुंबईमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. किरण खेर मल्टीपल मायेलोमा (multiple myeloma) या विकाराने ग्रस्त आहेत, जो एक रक्ताच्या कर्करोगाचा प्रकार आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम देत अनुपम खेर यांनी किरण यांना रक्ताचा कर्करोग झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
किरण खेर घरामध्ये पडल्या आणि यामध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. यादरम्यान करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांद्वारे किरण यांना मल्टीपल मायेलोमा विकार झाल्याचे निदान झाले. किरण खेर यांना ग्रासलेल्या मल्टीपल मायेलोमा विकाराची लक्षणे आणि कारणे सविस्तर जाणून घेऊया.