Kirron Kher Birthday : मूळची पंजाब शीख कुटुंबातील किरण खेरचा जन्म बंगळुरूमधील म्हैसूरमध्ये झाला. त्यानंतर त्यांचं कुटुंब चंदीगडमध्ये स्थलांतरित झालं. त्या काळात किरण यांना किरण ठक्कर सिंह संधू या नावाने ओखळलं जायचं. चंदीगडमध्ये त्या थिएटर करत असताना त्यांची भेट अनुपम खेरशी झाली. त्यांच्यामध्ये मैत्री झाली. त्यानंतर किरण मुंबईत आल्या. जिथे त्यांची भेट व्यापारी आणि अमिताभ बच्चन यांचे मित्र गौतम बेरीशी झाली. त्या दोघांमध्ये मैत्री नंतर प्रेम झालं. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
किरण आणि गौतम लग्नानंतर खूप आनंदी होते पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. किरण आणि गौतम यांच्या प्रवास स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या दोघांना सिकंदर नावाचा मुलगा आहे. काही काळाने या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. तेव्हा सिकंदर केवळ पाच वर्षांचा होता. तिकडे या दरम्यान अनुपम खेर आपल्या आयुष्यात पुढे गेले होते. त्यांनी मधुमालती नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. अनुपम खेरसुद्धा या लग्नात खूष नव्हते.
चंदीगड सोडल्यानंतर अनुपम आणि किरण कोलकातात भेटले. तेव्हा दोघांचं लग्न झालं होतं. या भेटीच्या वेळी त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेम जाणवलं. एका मुलाखतीत किरण यांनी सांगितल की, जेव्हा त्या अनुपम यांना कोलकाताला भेटल्या तेव्हा ते पूर्णपणे बदल्या होत्या. त्यांनी मुंडण केलं होतं. नाटक संपल्यानंतर अनुपम बाय म्हणायला माज्या खोलीजवळ आला होता. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे जसं पाहिलं त्यानंतर आमच्यामध्ये सगळंच काही बदललं. आमच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे हे आम्हाला जाणवलं. त्यानंतर दोघांनी आपल्या आपल्या जोडीदाराला घटस्फोट दिला आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली.
किरण खेर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चंदीगडमधून लोकसभेच्या खासदार होत्या. तर त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या. पण एकुलता एक भाऊ अपघातात मृत्यूमुखी पडला. तर बहीण कंवल ठक्कर कौर ही अर्जुन पुरस्कार विजेती बॅडमिंटनपटू आहे. तर शरणजीत कौर संधू ही त्यांची दुसरी बहीण.
'देवदास' मंगल पांडे, रंग दे बसंती, वीर-जारा, देवदास, कर्ज, हम, मैं हूं ना, दोस्ताना, सरदारी बेगम, कभी अलविदा ना कहना, मिलेंगे-मिलेंगे, कमबख्त या चित्रपटात काम केलंय. स्त्री भ्रूणहत्येविरोधातील 'लाडली' या मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच कॅन्सरविरोधातील 'रोको कॅन्सर' या मोहिमेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे किरण खेर यांनी कॅन्सरवर मात केलीय.