किशोर कुमार प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांनी आपला धर्म बदलला आणि आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला

किशोर कुमार यांना आपल्या कामावर जितकं प्रेम मिळालं तितकं ते त्यांच्या प्रेमामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत

Updated: Apr 21, 2021, 12:27 AM IST
किशोर कुमार प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांनी आपला धर्म बदलला आणि आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि संगीतकार किशोर कुमार यांना आपल्या कामावर जितकं प्रेम मिळालं तितकं ते त्यांच्या प्रेमामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांनी 4 लग्न केली. मात्र यापैकी कोणतही लग्न फार काळ टिकलं नाही. अगदी ते एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात इतके अडकले की, त्यांनी धर्म बदलला आणि लग्न केलं. मात्र, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दिलफेंक आशिक या नावाने त्यांना आळखलं जावू लागलं

केएल सहगल यांच्यासारखं बनण्यासाठी सोडलं घर
किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणीचं नाव अभस कुमार गांगुली होतं. किशोर कुमार यांनी गायक होण्याचा निर्णय घेतला होता. आणि वयाच्या 18व्या वर्षी ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईला पोहोचले. के.एल. सहगल यांची गाणी ते कायम ऐकत असत. त्यांच्या गाण्यांनी किशोर कुमार यांचा गायक होण्याचा आत्मविश्वास वाढवला होता.

लग्न झालं असतानाही दुसर्‍या महिलेच्या प्रेमात बुडाले
किशोर कुमार यांनी वयाच्या 21व्या वर्षी बंगाली चित्रपट अभिनेत्री रुमा घोषसोबत लग्न केलं. आणि याच दरम्यान, किशोर कुमार प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा त्यांची पत्नी रूमा यांना हे कळलं तेव्हा तिथे खळबळ उडाली. लग्नाच्या 8 वर्षानंतर 1958मध्ये हे दोघं विभक्त झाले. दोघांना एक मुलगा अमित कुमार आहे.

धर्माबरोबरच मधुबालासोबत लग्न करण्यासाठी बदललं नाव
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर किशोर कुमारने मधुबालाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. किशोर कुमारने आपला धर्म बदलून मधुबालाशी लग्न केल आणि किशोर कुमार करीम अब्दुल्ला बनले. 1960 मध्ये दोघांचं लग्न झालं. किशोर कुमार यांचं हे दुसरही लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षानंतर मधुबाला यांचं अचानक निधन झालं

तिसरं लग्न दोन वर्षेही टिकलं नाही
मधुबाला यांच्या मृत्यूच्या दु: खात किशोर कुमार 5 वर्षे एकटे राहिले. दरम्यान, त्यांची भेट अभिनेत्री योगिता बालीशी झाली. दोघांनीही एकमेकांचं प्रेम स्वीकारलं आणि 1976 मध्ये लग्न केलं. किशोर कुमार यांचं हे तिसरं लग्न होतं. तोपर्यंत किशोर कुमार बॉलीवूडचे सर्वात मोठे स्टार बनले होते. किशोर कुमार आणि योगिता बाली यांच लग्न दोन वर्षानंतर 1978 मध्ये तुटलं.