close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जर हेमा मालिनी माझी आई असती... ट्विंकल का बोलली असं?

असं का म्हणाली ट्विंकल?

जर हेमा मालिनी माझी आई असती...  ट्विंकल का बोलली असं?

मुंबई  : ट्विंकल खन्ना ही फक्त अभिनेत्रीच नाही तर एका स्टार अभिनेत्याची पत्नी आहे. एक लेखक आणि एक कॉलमिस्ट आहे. 'पजामास आर फॉरगिविंग' या पुस्तकामुळे लेखिका ट्विंकल खन्ना भरपूर चर्चेत आली. ट्विंकल खन्नाचं हे तिसरं पुस्तक आहे. या अगोदर तिचं 'द लेजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' आणि "मिसेज फनीबोन' अशा तिच्या 2 पुस्तकांची नावे आहेत. 

आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ट्विंकल खन्नाने आपला नवरा अक्षय कुमार आणि आई डिंपल कपाडिया यांच्याबद्दल मनमोकळी बोलली. करण जोहरने ट्विंकलला प्रश्न विचारला की, तू हे पुस्तक तुझ्या आईला का समर्पित केलं आहेस? त्यावर ट्विंकलने उत्तर दिलं की, कारण तिने मला कधीच कोणत्याही क्षेत्रात प्रोत्साहन दिलं नाही. ती कायम माझ्यातील कमतरता शोधून काढते. ट्विंकलने पुढे म्हटलं की, मी जेव्हा लिहायला सुरूवात केली, तेव्हा मी आईला फोन करून विचारलं की, तू माझं कॉलम वाचलंस का? त्यावर तिने उत्तर दिलं की, मी तुझा कॉलम वाचलाच नाही. मात्र काल रात्री जेवताना मी काहीच चांगल केलं नाही. तिचं हे उत्तर मला खूप शॉकिंग होतं. त्यावर पुढे ट्विंकल म्हणाली की, मला असं वाटतं की, जर हेमा मालिनी माझी आई असती. तर मला केंटचा वॉटर प्युरिफायर तर फ्रीमध्ये मिळालं असतं.

आपल्याला माहितचं आहे, ट्विंकल आणि डिंपल यांच्यात पहिल्यापासून कधीच चांगल नातं नव्हतं. त्यांच्यातील वाद अनेकदा जगासमोर आला आहे. पण ट्विंकल खन्नाचं हे वक्तव्य आता सर्वांनाच धक्कादायक आहे.