close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

झी युवा सादर करणार 'सूर राहू दे'

कोण आहे या मालिकेत

झी युवा सादर करणार 'सूर राहू दे'

मुंबई : 'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत   झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. झी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी 'सूर राहू दे' ही नवी मालिका लवकर सादर करणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे.

या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. गौरी एक सध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल मुलगा सादर करणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा प्रोमो पाहिला असता त्यात गौरी एका खानावळीत काम करताना दिसते आणि संग्रामला त्या खानावळीतील जेवण आवडत म्हणून तो वेटरला टीप द्यायला जातो पण दुसरीकडे गौरी त्याला अडवून पैशापेक्षा 2 कौतुकाचे बोल जास्त महत्वाचे आहेत ते सांगते. प्रोमोने प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिघेला नेली आहे.

भावणीकता आणि व्यवहरिकता यांची सांगड घालणारी ही कथा 'सूर राहू दे' या मालिकेद्वारे 1 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनी झी युवावर भेटीस येणार आहे