प्लास्टिक सर्जरीनंतर अभिनेत्रीची अवस्था वाईट, काम मिळणं ही झालं मुश्किल

आयटम सॉन्ग आणि हॉटनेससाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे गायब आहे. 

Updated: Jan 9, 2022, 02:11 PM IST
प्लास्टिक सर्जरीनंतर अभिनेत्रीची अवस्था वाईट, काम मिळणं ही झालं मुश्किल title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये तिच्या आयटम सॉन्ग आणि हॉटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कोएना मित्रा आता रुपेरी पडद्यावरून पूर्णपणे गायब आहे. अभिनेत्रीच्या एका चुकीने तिला पूर्णपणे बुडवलं. कोएना मित्राने काही वर्षांपूर्वी तिचा लूक सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्याचा तिच्यावर वाईट परिणाम झाला आणि चेहराच खराब झाला. कोएना मित्रा हिने नुकतंच तिच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं आणि तिला कशा प्रकारे सामना करावा लागला हे तिने सांगितलं.

एका मुलाखतीत कोयनाने सांगितलं की, शस्त्रक्रियेमुळे तिला सलग तीन वर्षे त्रास देण्यात आला. याबद्दल अनेक नकारात्मक गोष्टीही तिच्याबद्दल लिहिल्या गेल्या, त्यानंतर इंडस्ट्रीतील लोकांनी तिच्यापासून अंतर ठेवलं आणि त्याचा परिणाम तिच्या कामावरही झाला. ती पुढे म्हणाली की, जेव्हा ती या इंडस्ट्रीत आली तेव्हा तिला कोणत्याही प्रकारची याबद्दल कल्पना नव्हती. आपल्या शस्त्रक्रियेबाबत तिने हे उघडपणे मान्य केलं होतं. त्यानंतर तिला असं वाटू लागलं की, सगळं जग माझ्यामागे आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, प्रसारमाध्यमांनीही तिला सोडलं नाही आणि सतत नकारात्मक बातम्या चालवल्या गेल्या. कोएना पुढे म्हणाली की, 'मला माझ्या प्लास्टिक सर्जरीबद्दल कोणताही पश्चाताप नाही. माझा चेहरा, माझं जीवन. मला वाटत नाही की, लोकांना यात काही अडचण असावी'.

कोएना मित्राने सुधारित शस्त्रक्रिया केली होती. ज्याला 'राइनोप्लास्टी' असं नाव देण्यात आलं आहे. त्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले. 'मुसाफिर' चित्रपटातील 'साकी साकी' या गाण्याने स्टारडम मिळविणारी कोयना मित्रा 'बिग बॉस 13' मध्ये दिसली तेव्हाही ती खूप चर्चेत आली होती.