कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला प्रवास करताना आला धक्कादायक अनुभव

अंकिताने नुकताच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत अंकिता तिला कोकणात जाताना आलेला भयानक अनुभवाबद्दल सांगते. अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

सायली कौलगेकर | Updated: Aug 16, 2023, 09:30 PM IST
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला प्रवास करताना आला धक्कादायक अनुभव title=

मुंबई :  कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिताने सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ शेअर करताच तो झपट्याने व्हायरल होतो. अंकीताचे व्हिडीओ चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरत असतात.  अंकीता ही रील स्टार म्हणुन जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती अनेकदा सामाजिक भानही जपत असते. मात्र अंकिता यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

अंकिताने नुकताच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत अंकिता तिला कोकणात जाताना आलेला भयानक अनुभवाबद्दल सांगते.  यावेळी बोलताना अंकिता सांगते की, तिला या रस्त्यावर चकवा लागला. मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास करताना अंकितासोबत हा सगळा प्रकार घडला, यावेळी बोलताना अंकिता म्हणाली खरंतर मी या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही. पण माझ्यासोबत हा सगळा प्रकार घडला आहे. दरवेळी मी गगनबावडा घाटातून जाते. मात्र यावेळी मला मॅप फोंडा घाटाच्या दिशेने घेवून गेला. गगनबावडा टाकून सुद्धा आम्ही फोंडा घाटातून गेलो. आणि मला चकवा लागला. यावेळी तिने सांगितलं की, त्यावेळी आम्ही परत परत एकाच रस्त्यावर येत होतो. एवढंच नव्हेतर रस्त्यावर तिला जळती चिता दिसल्याचंही तिने या व्हिडीओच्या माध्यामातून सांगितलं आहे.

अंकिताचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते तिला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. अनेकदा अंकिता तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेकदा अंकिता सामाजिक कार्य करताना दिसते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

लवकरच अंकिताचा 'तूच मोरया' हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडीओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत असून अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे.