छोट्या मुलीला क्रितीनं दाखवला Attitude! व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त म्हणाले...

Kriti Sanon Troll : क्रिती सेननचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 25, 2024, 01:45 PM IST
छोट्या मुलीला क्रितीनं दाखवला Attitude! व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त म्हणाले... title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Kriti Sanon Troll : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन हे दोघं सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'तेरी बातों में उलझा जिया' चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यातील क्रिती आणि शाहिदचे डान्स स्टेपस्ट हे चांगलेच चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इथे तिथे जात असलेल्या शाहिद आणि क्रितीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी क्रितीला तिच्या स्वभावासाठी ट्रोल केले आहे. 

शाहिद आणि क्रितीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघं मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्यावेळी एका चाहतीला पाहता शाहिदनं तिला जवळ येण्याचा इशारा केला. त्याची चाहती येताच तिनं शाहिदसोबत हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. यावर शाहिदनं नम्रतेनं तिला हॅन्डशेक केला. तर दुसरीकडे आनंदात असलेल्या या चाहतीनं क्रितीसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्रितीनं तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर क्रितीला पापाराझींनी त्या चाहतीविषयी सांगता तिनं पाहिलं. तरी देखील क्रितीनं हात मिळवला नाही, तर तिचे केस ठीक करत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्रितीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अरे देवा, बिचारी मुलगी. क्रितीनं असं करणं खूप चुकीचं होतं. इतक्या गोड मुलीकडे तिनं दुर्लक्ष केलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फ्लॉप अभिनेत्री.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्यात इतका स्वाभिमान आहे की या सेलिब्रिटींसोबत हात मिळवण्यासाठी जाणार नाही.' आणखी एक नेटकरी शाहिदची स्तुती म्हणाला, 'शाहिद खरंच खूप चांगला आहे.' तर काही नेटकऱ्यांनी क्रितीची बाजु घेतली आहे. एक म्हणाला 'तिनं पाहिलंच नाही की ती मुलगी हात मिळवण्याचा प्रयत्न करते.' तर काही नेटकऱ्यांनी क्रितीची खिल्ली उडवली आहे. 'हे कळलं नाही की त्या मुलीनं क्रितीचा अपमान केला की स्वत: चा अपमान करून घेतला?'

हेही वाचा : ना प्राजू, ना 'सानपाडा' या तरुणीबरोबर लग्नबंधनात अडकणार दगडू! मुहूर्त अन् तारीखही ठरली

दरम्यान, क्रिती आणि शाहिदचा 'तेरी बातों में ऐसे उलझा जियां' हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर आता नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटातून खूप जास्त अपेक्षा आहे.