मोठी बातमी! वाल्मिक कराड अखेर शरण; CID ने पुण्यातून ताब्यात घेण्याआधी म्हणाला, 'मी...'

Walmik Karad Surrender: 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यापासून या प्रकरणावरुन राजकारण तापल्याचं चित्र दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 31, 2024, 12:30 PM IST
मोठी बातमी! वाल्मिक कराड अखेर शरण; CID ने पुण्यातून ताब्यात घेण्याआधी म्हणाला, 'मी...' title=
पुण्यात आला शरण

Walmik Karad Surrender: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून फरार होता. त्याने एक व्हिडीओ प्रदर्शित करुन आपण शरण येत असल्याची घोषणा केली. 

शरण येण्याआधी व्हिडीओ जारी करत म्हणाला...

वाल्मिक कराडसहीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली. त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकत नाही, अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून होती. तसेच वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नव्हता. वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याच्या बातम्या रविवारी समोर आली. त्यामुळेच वाल्मिक कराड सोमवारी रात्री उशीरापर्यंत शरण येईल असं सांगितलं जातं होतं. मात्र सोमवारी वाल्मिकी शरण आला नाही. मात्र आज दुपारच्या सुमारास वाल्मिकीने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची खंडणी मागितली नाही असा दावा केला आहे. तसेच आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचेही त्याने म्हटलं आहे. 

नातेवाईकांची खातीही गोठवली

वाल्मिक कराडसहीत एकूण 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हा वाल्मिक कराडसाठी मोठा धक्का मानला जात होता. खाती गोठवल्याने आर्थिक कोंडी झाली. मंगळवारी वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खातीही गोठवण्यात आली. त्यामुळेच आज वाल्मिक कराड शरण आला.

कसा केला जातोय या प्रकरणाचा तपास?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीची 9 पथकं कार्यरत आहेत. या तपासामध्ये दीडशे अधिकारी अन् कर्मचारी आहेत. फरार आरोपींच्या पासपोर्टविषयीही कारवाई सुरु आहे. केवळ राज्यच नाही तर देशभरामध्ये या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरी ठशांचे निशाण आरोपींबरोबर जुळून आल्याची माहितीही समोर येत आहे. आरोपींच्या स्कार्पिओ कारमध्ये मिळून आलेले अन् जप्त केलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मोबाईल सीआयडीकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये नेमकं काय दडलं आहे हे तपासणीनंतर समोर येणार आहे. अद्याप मोबाईलमधील कुठलेही व्हिडिओ अथवा चॅट समोर आले नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील तपासणीनंतरच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला का? व्हिडिओ कॉल केला का? फोन कोणाला केला का? या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.