...म्हणून अभिनेत्री कृती सेननने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन हिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 17, 2017, 03:55 PM IST
...म्हणून अभिनेत्री कृती सेननने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास दिला नकार  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन हिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त समोर येत आहे.

अभिनेत्री कृती सेननचा नुकताच 'बरेली की बर्फी' हा सिनेमा रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी बातम्या समोर येत होत्या की, कृती सेनन लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत विशाल भारद्वाजच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार आहे. मात्र, आता याच संदर्भात एक बातमी समोर आली आहे.

हा एक रोमॅन्टीक-ड्रामा-कॉमेडी सिनेमा असणार असून आदित्य निंबाळकर डायरेक्ट करणार आहे. बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आपण या रोलसाठी फिट नसल्याचं कृतीला वाटत आहे. त्यामुळे आता या सिनेमासाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, या सिनेमाची स्टोरीत उत्तर भारतातील एका शाळेत शूट करणार असल्याचं ठरलं आहे. या सिनेमात भूमिका करण्यासाठी अनेक अभिनेत्रींसोबत बोलणं सुरु आहे.